पलोटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST2020-12-31T04:09:51+5:302020-12-31T04:09:51+5:30

वाणिज्य पट्टा ... ७ बाय २ ... नागपूर : कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानाला प्रतिसाद देताना पलोटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनने ...

By Pluto Group of Institutions | पलोटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनद्वारे

पलोटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनद्वारे

वाणिज्य पट्टा ... ७ बाय २ ...

नागपूर : कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानाला प्रतिसाद देताना पलोटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनने ख्रिसमसचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने शहरात समाजातील कमी वंचित घटाकांमध्ये साजरा केला. ‘पलोटी ब्रेड’ या त्यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत २५ डिसेंबरला भगवान येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त फूड किट वितरण कार्यक्रमांचे आयोजन केले. नागपूर शहर व ग्रामीण भागातील एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना डाळी आणि दैनंदिन कुकिंगसह १५ वस्तूंचा समावेश असलेली फूड किट प्रदान केली. पलोटीनगर येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी स्कूलमधील फूड किट वितरणाचे उद्घाटन समूहाचे अध्यक्ष फादर जॉय पलाचौवतिल यांच्या हस्ते झाले. गोरेवाडाजवळील पिली नदीकाठी राहणाऱ्या प्रवासी कामगारांना २०० किटचे वाटप करण्यात आले. बेसा येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी स्कूल येथे वितरण व्यवस्थापक फादर अ‍ॅन्टो कैथरथ यांच्या हस्ते करण्यात आले. वेळा आणि पिपळा ग्रामपंचायत अंतर्गत गरिबांना २५० किट देण्यात आल्या. तसेच वर्धा रोडवरील सेंट व्हिन्सेंट पलोटी महाविद्यालयात संचालक फादर पॉल चंद्रकुनेल यांच्या हस्ते परसोडी, रुई आणि गावसी ग्रामपंचायत येथील गरजूंना २०० फूड किटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम कर्मचारी आणि कॉलेजच्या एनएसएस युनिटच्या स्वयंसेवकाच्या मदतीने राबविण्यात आला. हा समूहाचा गेल्या अनेक महिन्यांपासून चॅरिटी उपक्रमात सहभाग आहे. (वा.प्र.)

Web Title: By Pluto Group of Institutions