आकाेली येथे महिलांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:41+5:302021-03-09T04:10:41+5:30

कुही : ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना थाेर पुरुषांची नावे देण्याचा आदेश ग्रामपंचायत कार्यालयांना नुकताच प्राप्त झाला. त्याअनुषंगाने आकाेली (ता. कुही) ...

The plight of women at Akaeli | आकाेली येथे महिलांचा गाैरव

आकाेली येथे महिलांचा गाैरव

कुही : ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना थाेर पुरुषांची नावे देण्याचा आदेश ग्रामपंचायत कार्यालयांना नुकताच प्राप्त झाला. त्याअनुषंगाने आकाेली (ता. कुही) येथील अंगणवाडी क्रमांक-१ चे सावित्रीबाई फुले अंगणवाडी व अंगणवाडी क्रमांक-२ चे माँ जिजाऊ अंगणवाडी असे नामकरण करण्यात आले. यावेळी महिलांचा गाैरवही करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका शिक्षिका मोनाली ढोबळे यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामपंचायतच्यावतीने गाैरव करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हर परिषद सदस्य प्रमिला दंडारे, पंचायत समिती उपसभापती वामन श्रीरामे, पंचायत समिती सदस्य वैशाली भुजाडे, सरपंच गजानन धांडे, बाल विकास अधिकारी ज्योती गजभिये, पर्यवेक्षिका कावळे, निखार, मुख्याध्यापिका नागलवाडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज गजभिये उपस्थित होते. यशस्वितेसाठी अंगणवाडीसेविका अपर्णा शेंडे, सुमित्रा गजभिये, वैशाली ठाकरे, सविता शेंडे, मालती धांडे, मनीषा राघोर्ते, विकास बाभरे, अर्चना लुटे यांनी सहकार्य केले.

Web Title: The plight of women at Akaeli