शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रुग्णांच्या जिवाशी खेळ, बनावट इंजेक्शन्सच्या विक्रीचे रॅकेट; तुलसीनगरातून साठा जप्त, दिल्ली-मुंबईपर्यंत ‘लिंक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 00:08 IST

नागपूरमध्ये नागरिकांच्या जिवाशी थेट खेळ करणारे बनावट इंजेक्शन्सचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

नागपूर : नागपूरमध्ये नागरिकांच्या जिवाशी थेट खेळ करणारे बनावट इंजेक्शन्सचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. नफ्याच्या हव्यासापोटी आरोपींनी लोकांच्या आरोग्याशी व जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू होता. पोलिसांनी तुलसीनगरातून इंजेक्शन्सचा साठा जप्त केला आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे विविध औषध कंपन्या व डिस्ट्रीब्युटर्सकडील औषधे व इंजेक्शन्सची तपासणी करण्यात येते. याअंतर्गत मेसर्स हिताशी फार्मास्युटिकल्सची (तुलसी अपार्टमेंट्स, तुलसीनगर कॉलनी) येथे तपासणी केली असता तेथील ॲलब्युरेल या इंजेक्शनचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठविण्यात आली. ही तपासणी ऑक्टोबर २०२५ मध्ये झाली होती. याचा अहवाल आल्यावर विभागातील अधिकाऱ्यांना मोठा धक्काच बसला. ती इंजेक्शन बनावट असल्याची बाब अहवालातून समोर आली होती. ही औषधे थेट विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, म्हणजेच नागरिकांना बनावट इंजेक्शन्सचा पुरवठा सुरू होता. 

या प्रकरणात अन्न व औषध विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, दिल्ली, चंदीगड या शहरांपर्यंत रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याचे स्पष्ट झाले. अन्न व औषध विभागातील औषध निरीक्षक प्रशांत राजेंद्र रामटेके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मेसर्स हिताशी फार्मास्युटिकल्स, मेसर्स एन. आर. एन. मित्र डिस्ट्रीब्युटर्स-मुंबई, मेसर्स एन. आर. मित्र डिस्ट्रीब्युटर्स- हैदराबाद, मेसर्स आर.आर.टी. फार्मा-पनवेल-नवी मुंबई, दिल्लीतील दानिश खान व राजकुमार मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हजारो इंजेक्शन्सची विक्री

तपासात असे उघड झाले की, सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या काळात मोठ्या प्रमाणावर बनावट इंजेक्शन्सचा साठा तयार करून तो बाजारात विकण्यात आला. या बनावट इंजेक्शन्समुळे ती जणांचे आरोग्य बिघडले असेल, किती जणांचे उपचार अयशस्वी ठरले असतील, हा एक मोठा सवाल आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake injection racket busted in Nagpur, endangering patient lives.

Web Summary : A fake injection racket endangering lives was exposed in Nagpur. Authorities seized stock, revealing links to Delhi and Mumbai. The investigation unveiled widespread distribution of counterfeit drugs, potentially impacting patient health and treatment outcomes. Several individuals and distributors are now facing charges.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी