शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर ताणले पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:32 IST

गणेशमूर्तीचे विसर्जन करून परत आलेल्या गणेश मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याला एका गुंडाने कारचा कट मारला. त्याला कार सरळ चालव म्हणून सल्ला दिल्यामुळे गुंड आणि त्याच्या साथीदाराने शिवीगाळ करून पिस्तूल ताणले.

ठळक मुद्देगुंडांची बेदम धुलाई साथीदारांना मारहाण, बजाजनगरात पहाटेपर्यंत तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशमूर्तीचे विसर्जन करून परत आलेल्या गणेश मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याला एका गुंडाने कारचा कट मारला. त्याला कार सरळ चालव म्हणून सल्ला दिल्यामुळे गुंड आणि त्याच्या साथीदाराने शिवीगाळ करून पिस्तूल ताणले. त्यामुळे संतप्त गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पिस्तूल ताणणाऱ्या गुंडाची बेदम धुलाई केली. त्याच्या साथीदारांनाही चोप दिला आणि त्याच्या वाहनाचीही तोडफोड केली. काचीपुरा चौकात रविवारी पहाटे १.३० ते २ च्या सुमारास झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. दोन्हीकडील ‘मोठी’ मंडळी ठाण्यात पोहचल्यानंतर गुंडाच्या टोळीकडून माफीनाम्याची भाषा झाली अन् वादावर पडदा पडला.सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून मध्यरात्री परतले. बजाजनगर चौकातील एका भोजनालयात जेवण घेतल्यानंतर हे सर्व घरी जाण्याच्या तयारीत असताना पहाटे १.४५ च्या सुमारास गुंडाची कार सिनेस्टाईल भोजनालयासमोर थांबली. गुंडाच्या टोळीच्या म्होरक्याने मंडळाच्या प्रमुखाला कारचा कट मारला. पायावरून कारचे चाक जाणार असल्याचे लक्षात आल्याने मंडळ प्रमुखाने प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतली. त्यानंतर कार चालविणाऱ्या गुंडाला सरळ कार चालविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गुंडाने अरेरावी करीत शिवीगाळ केली. पिस्तूलही ताणले. ते पाहून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दारूच्या नशेत टुन्न असलेल्या गुंडाला बाहेर खेचून त्याची तसेच त्याच्या साथीदारांची बेदम धुलाई केली. मंडळाचे कार्यकर्ते हावी झाल्याचे पाहून गुंड आणि त्याचे साथीदार सैरावैरा पळाले. त्यांनी आपल्या साथीदारांना फोन करून बोलवून घेतले. इकडे काही जणांनी गुंडाच्या महागड्या कारची तोडफोड केली. दरम्यान, गुंडाचे काही साथीदार बजाजनगर ठाण्यात पोहचले, तर मंडळाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येत ठाण्यात पोहचले. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पहाटे ३ वाजेपर्यंत दोन्हीकडून एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदविण्याची भाषा वापरली जात होती. गुंड शहरातील एका खतरनाक टोळीचे सदस्य असल्याचे लक्षात आल्याने, रात्रपाळीवर असलेले अनेक पोलीस अधिकारी बजाजनगर ठाण्यात पोहचले. दुसरीकडे दोन्ही गटाकडून काही ‘मोठी’ मंडळी ठाण्यात पोहचली. काहींनी फोनवरूनही समेटाचे प्रयत्न केले. त्यानंतर दोन्ही गटांनी ठाण्यातून काढता पाय घेतला.सीसीटीव्ही फुटेजची तपासणीमहागड्या कारची मोठी तोडफोड झाल्याची तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीची ओळख पटविण्यात येणार असल्याचे बजाजनगर पोलिसांनी यासंबंधाने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी