मनोहर यांची निसर्ग चित्रे एक चमत्कारच

By Admin | Updated: May 14, 2014 00:45 IST2014-05-14T00:45:22+5:302014-05-14T00:45:22+5:30

सौंदर्यदृष्टी असणार्‍या दिगंबर मनोहर यांना टाकाऊ वस्तूंमध्येच कलाकृतीचे मूळ दिसते. या वस्तूच त्यांच्या चित्रांची प्रेरणा ठरतात. या टाकाऊ वस्तूंपासून सुंदर चित्र निर्माण होतात. पण

Pictures of Manohar's nature are a miracle | मनोहर यांची निसर्ग चित्रे एक चमत्कारच

मनोहर यांची निसर्ग चित्रे एक चमत्कारच

अभय बंग : अकल्पचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनअकल्पचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन विष्णूजी की रसोईयेथे झाले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग, वनराईचे विश्‍वस्त गिरीश गांधी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील, डॉ. वेद पाठक, स्नेहलता मनोहर आदी उपस्थित होते.सेलिब्रेशनआहे. हे भाग्य प्रत्येक कलावंताना मिळो, अशी सदिच्छा आहे. गांधी म्हणाले, दिगंबर मनोहर यांचे चित्र मनमोहक आणि विचार करायला लावणारे तर आहेतच सोबतच चित्रांसोबत असलेली कॉमेंट्सही प्रभावी आहेत. या वयात त्यांना कुटुंबाचा आधार मिळतो हे इतरांना प्रेरणा देणारे आहे.

नागपूर : सौंदर्यदृष्टी असणार्‍या दिगंबर मनोहर यांना टाकाऊ वस्तूंमध्येच कलाकृतीचे मूळ दिसते. या वस्तूच त्यांच्या चित्रांची प्रेरणा ठरतात. या टाकाऊ वस्तूंपासून सुंदर चित्र निर्माण होतात. पण ही चित्रे केवळ पाहणार्‍याच्या डोळ्यांना आल्हाद देणारी नव्हे तर रसिकांना विचार देणारी असतात. वयाच्या ८८ व्या वर्षी देखील चित्र काढण्याचा उत्साह म्हणजे एक चमत्कारच आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी येथे व्यक्त केले.

चित्रकार दिगंबर मनोहर यांच्या

डॉ. बंग म्हणाले, मनोहर यांच्या या वयात माणूस थकायला लागतो. हातातील कला सोडून जाते. परंतु त्यांचे इतिहास आणि वस्तुस्थितीचे आकलन देणारे, विचार करायला भाग पाडणारी ही चित्रे पाहताना चमत्काराचा भास होतो. हा सोहळा म्हणजे कलेचे, आणि प्रेमाचे

संचालन शेफ विष्णू मनोहर यांनी केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर, छायाचित्रकार विवेक रानडे, मैत्री परिवाराचे प्रा. प्रमोद पेंडके, चंदू पेंडके, सुचित्रा सहस्रभोजने, प्रफुल्ल मनोहर व प्रवीण मनोहर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वृक्षांची वाळलेली पाने, कांद्याची टाकाऊ साल, फळांचे साल, पक्ष्यांचे पंख, बदाम, पिस्ता, अक्रोडची खोलपटे, प्लायवुडचे तुकडे, शेंगांची टरफले या सार्‍याच टाकाऊ वस्तूंपासून चित्रकार दिगंबर मनोहर यांनी चित्रे साकारली आहेत. यांचे हे चित्र प्रदर्शन १८ मे पर्यंत खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Pictures of Manohar's nature are a miracle