शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पपीडित शेतकऱ्यांचा मोबदला कायम

By admin | Updated: April 20, 2017 02:51 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकल्पपीडित शेतकऱ्यांचा वाढीव मोबदला कायम ठेवून

हायकोर्टाचा निर्णय : पाटबंधारे  विकास महामंडळाला दणका नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकल्पपीडित शेतकऱ्यांचा वाढीव मोबदला कायम ठेवून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दणका दिला. केवळ व्याजासंदर्भातील आदेशात बदल झाल्यामुळे महामंडळाला अल्पसा दिलासा मिळाला. रेखा चावरे, माधुरी चावरे व सारंग चावरे यांचा पीडित शेतकऱ्यांमध्ये समावेश असून, ते वर्धा येथील रहिवासी आहेत. मदन तलाव प्रकल्पाकरिता त्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. यासंदर्भात १२ आॅक्टोबर १९९८ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. भूसंपादन अधिकाऱ्याने १८ आॅगस्ट २००२ रोजी शेतकऱ्यांना ४७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे मोबदला दिला होता. शेतातील झाडांसाठी स्वतंत्र मोबदला देण्यात आला होता. या दोन्ही मोबदल्यावर असमाधान व्यक्त करून, शेतकऱ्यांनी मोबदला वाढवून मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दिवाणी न्यायालयाने शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रति हेक्टरप्रमाणे मोबदला मंजूर केला. झाडांच्या मोबदल्यात २० टक्क्यांनी वाढ केली. तसेच, वाढीव मोबदल्यावर जमिनीचा ताबा घेतल्याच्या तारखेपासून व्याज देण्याचे निर्देश महामंडळाला दिले. या निर्णयाविरुद्ध महामंडळाने उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी कायद्यातील विविध तरतुदी लक्षात घेता, महामंडळाचे अपील केवळ अंशत: मंजूर केले. शेतकऱ्यांचा जमीन व झाडांचा वाढीव मोबदला कायम ठेवला. व्याजाच्या आदेशात थोडा बदल केला. वाढीव मोबदल्यावर जमिनीचा ताबा घेतल्याच्या तारखेऐवजी अवॉर्ड जारी झाल्याच्या तारखेपासून व्याज देण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा संदर्भ देऊन हा आदेश देण्यात आला.(प्रतिनिधी)