शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

पक्का वाहन परवानाही होणार आॅनलाईन

By admin | Updated: November 11, 2014 00:58 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवाराला आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडणे शक्य झाले आहे.

आरटीओ : सोय पुढील महिन्यापासूननागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवाराला आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडणे शक्य झाले आहे. मागील महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच धर्तीवर १ डिसेंबरपासून पक्क्या वाहन परवान्यासाठी आॅनलाईन भेटीची वेळ देण्याची पद्धत लागू होण्याची माहिती आहे. शिकाऊ परवानासाठी प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायद्यानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी आरटीओ उमेदवारांची प्रचंड गर्दी होत होती.नागरिकांना तासनतास उभे राहावे लागायचे. त्यामुळे वेळ आणि श्रम वाया जात होता. काही वेळा पूर्ण दिवस वाया जात होता. या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन कार्यालयाने आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली. आरटीओ, शहर व ग्रामीण कार्यालयात १ सप्टेंबरपासून तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये १७ सप्टेंबरपासून ही पद्धत सुरू झाली. सुरुवातीला याला कमी प्रतिसाद मिळाला, परंतु आठवड्याभरातच चांगला प्रतिसाद मिळू लागला. आता याला घेऊनच पक्के परवानासाठीही हीच पद्धत लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. या सोयीमुळे उमेदवाराला वाहन चाचणीसाठी आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवड करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)