शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारावर प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: July 4, 2014 01:10 IST

वर्षभरापासून पूर्णवेळ माहिती आयुक्त नसल्याने नागपूर विभागातील जवळपास दोन हजारावर माहिती अधिकाराची प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभागाचे नवीन माहिती आयुक्त वसंत पाटील यांच्यासमोर ही

वर्षभरानंतर मिळाले माहिती आयुक्त : आज पदभार स्वीकारणार नागपूर : वर्षभरापासून पूर्णवेळ माहिती आयुक्त नसल्याने नागपूर विभागातील जवळपास दोन हजारावर माहिती अधिकाराची प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभागाचे नवीन माहिती आयुक्त वसंत पाटील यांच्यासमोर ही प्रकरणे निकाली काढणे हे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता वसंत दत्तात्रय पाटील यांची नागपूर विभागाचे राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील राज्य माहिती आयोग कार्यालयात त्यांनी बुधवारी शपथ घेतली. वसंत पाटील हे मूळचे जामनेर जळगाव येथील रहिवासी असून, पुणे येथून त्यांनी बीई सिव्हिल केले आहे. १९८० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ते सेवेत दाखल झाले. उद्या, शुक्रवारी ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील. नागपूर विभागाचे माहिती आयुक्त बी.टी. पाटील यांची १८ जुलै २०१३ रोजी बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. औरंगाबादचे माहिती आयुक्त डी.बी. देशपांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. महिन्यातून ते काही दिवस येथे येऊन सुनावणी घेत होते, तरी नियमित माहिती आयुक्त नसल्याने सुनावणीसुद्धा अनियमित होत होती. परिणामी प्रकरणे प्रलंबित राहत गेली. सध्या सुरू असलेल्या प्रकरणांपैकी दोन हजारांवरील प्रकरणे प्रलंबित आहेत. पूर्वीपासूनची अनेक प्रकरणे अजूनही तशीच असल्याची माहिती आहे. त्यामुळे माहिती अधिकारांतर्गत द्वितीय अपील करणाऱ्या अर्जदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रकरणांवरही परिणाम पडत होता. (प्रतिनिधी)पुन्हा एकदा पाटील राज्य माहिती आयोगाचा कारभार सुरू झाला तेव्हापासून नागपूर विभागाच्या आयुक्तपदी पाटील आडनावाच्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. सर्वप्रथम विलास पाटील हे नागपूर व अमरावती विभागाचे संयुक्त माहिती आयुक्त होते. २७ डिसेंबर २००६ ते १३ आॅक्टोबर २०१० पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. आतापर्यंत सर्वाधिक कालावधीसाठी तेच आयुक्त होते. त्यानंतर पी.डब्ल्यू. पाटील यांनी पदभार सांभाळला. ते १५ आॅक्टोबर २०१० ते १६ जून २०१२ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्यानंतर बी.टी. पाटील आले. ते १८ जून २०१२ ते १८ जून २०१३ पर्यंत कार्यरत होते. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. दरम्यान, औरंगाबादचे माहिती आयुक्त डी.बी. देशपांडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. आता पुन्हा वसंत पाटील यांची नियमित राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.