शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पीटरच्या खुनातील पाच आरोपींचा पीसीआर वाढला

By admin | Updated: July 4, 2015 03:12 IST

मानकापूर येथील जगदंबा हाईटस्मध्ये झालेल्या मोहित पीटर याच्या खुनातील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत प्रथम ...

नागपूर : मानकापूर येथील जगदंबा हाईटस्मध्ये झालेल्या मोहित पीटर याच्या खुनातील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. शर्मा यांच्या न्यायालयाने ९ जुलैपर्यंत वाढ केली. तंबी ऊर्फ जेम्स बबलू ऊर्फ क्लेमंट गबरेल (२१) , ब्रायन ऊर्फ इब्राहिम बॅस्टिन कॅनेथ (२१) दोन्ही रा. मार्टीननगर, राजेंद्र ऊर्फ पापा जयराम साळवे (२२) रा. कौशल्यायननगर, सचिन ऊर्फ अण्णा पलटी डॅनिएल गबरेल (२७) आणि आशिष ऊर्फ मॅडी वीरेंद्र राठोड (२६) रा. स्वावलंबीनगर, अशी आरोपींची नावे आहेत. यापूर्वी याच गुन्ह्यातील सागर ऊर्फ फ्रँक अन्थोनी आणि दीपक ऊर्फ अँगल फ्रान्सिस अलेक्झांडर, यांचा ५ जुलैपर्यंत पोलीस कठडी रिमांड घेण्यात आलेला आहे. या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपताच त्यांना तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अवधेश त्रिपाठी यांनी न्यायालयात हजर केले. २६ जून २०१५ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास दहा-बारा जणांनी मोहित मार्टिन पीटर हा मानकापूर येथील जगदंबा हाईटस्स्थित मार्लिन बिल्डिंग मटेरियल ट्रान्सपोर्टच्या दुकानात मिखील मायकल फ्रान्सिस याच्यासोबत बसला असता तंबी आणि त्याच्या साथीदारांनी सशस्त्र हल्ला करून पीटरचा भीषण खून केला होता. घटनेच्या दिवशीच गिट्टीखदान पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर रविवारी सागर आणि दीपक यांना अटक केली होती. आज सहायक सरकारी वकील रत्ना घाटे यांनी पाचही आरोपींचा ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून देण्यात यावा, अशी मागणी केली. आरोपींकडून या खुनासाठी सुपारी देणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन अटक करावयाची आहे. आरोपींच्या आणखी साथीदारांना अटक करणे आहे. त्यांचा ठावठिकाणा आरोपींकडून माहीत करून घेणे आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. लुबेश मेश्राम यांनी वाढीव पोलीस कोठडी रिमांड मागणीचा विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींच्या पोलीस कोठडीत ९ जुलैपर्यंत वाढ केली. (प्रतिनिधी)