शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खोळंबलेल्या प्रवाशांना सर्वच बसेसमध्ये ‘लिफ्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:59 IST

अपघात झालेल्या, फेल पडलेल्या एसटी बसमधील प्रवाशांना आता खूप वेळ अडकून पडावे लागणार नाही. शिवशाहीसह सर्वच प्रकारच्या बसमध्ये लिफ्ट मिळणार आहे. शिवाय जादा भाडेही आकारले जाणार नाही. प्रवासी लोकवाहिनीकडे आकर्षित व्हावा, यासाठी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.

ठळक मुद्दे लालपरीच्या प्रवाशांना शिवशाहीसुध्दा घेणार

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपघात झालेल्या, फेल पडलेल्या एसटी बसमधील प्रवाशांना आता खूप वेळ अडकून पडावे लागणार नाही. शिवशाहीसह सर्वच प्रकारच्या बसमध्ये लिफ्ट मिळणार आहे. शिवाय जादा भाडेही आकारले जाणार नाही. प्रवासी लोकवाहिनीकडे आकर्षित व्हावा, यासाठी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.फेल पडलेल्या किंवा अपघात झालेल्या बसमधील प्रवाशांना ते ज्या श्रेणीच्या बसमधून प्रवास करीत असेल, त्याच श्रेणीची बस येईपर्यंत अडकून पडावे लागत होते. समोरून निमआराम, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या बसेस भुर्रकन निघून जात होत्या, पण लालपरीच्या प्रवाशांना घेत नव्हत्या. घेतले तरी जादा भाडे मोजावे लागत होते. प्रवाशांना अंधारात, निर्मनुष्य ठिकाण, कोणत्याही सुविधा नसल्याच्या ठिकाणी थांबून राहावे लागत होते.फेल पडलेल्या साध्या बसमधील प्रवाशांना मार्गावरून जाणाऱ्या कुठल्याही बसमध्ये घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. यातूनच शिवशाही बससुध्दा सुटलेली नाही. पूर्वी ज्या बसमध्ये लिफ्ट मिळाली त्या बसचे तिकीट जास्त असल्यास अधिक भाडे द्यावे लागत होते. आता साध्या बसच्या प्रवाशाला त्याच बसच्या भाड्यामध्ये शिवशाहीला प्रवासी घ्यावे लागणार आहे.खोळंबलेल्या प्रवाशांची होणारी गैरसोय आणि त्रास नागरिकांनी विविध माध्यमातून नागरिकांनी महामंडळाकडे मांडला होता. याची दखल घेत महामंडळाने सर्वच बसमध्ये प्रवासी घेण्याचे परिपत्रक काढले आहे. फेल पडलेल्या किंवा अपघात झालेल्या ठिकाणी शक्यतो त्याच श्रेणीची बस पाठविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र अशी बस नसल्यास मार्गात असलेल्या कुठल्याही श्रेणीच्या बसचा पर्याय आहे.तर कर्मचाऱ्यांवर कारवाईबिघाड झालेल्या श्रेणीची बस उपलब्ध असताना उच्च श्रेणीची बस दिल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून झालेल्या नुकसानीची जबाबदारी संबंधित कर्मचाºयांकडून वसूल केली जाणार आहे. शिवाय पर्यायी बस पाठविण्यास सक्षम कारणाशिवाय विलंब झाल्यास खातेनिहाय कठोर कारवाईची तदतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :state transportएसटी