शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एअर अरेबियाचे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:07 IST

- शारजाह-बांगलादेश विमान : आपात्‌स्थितीत नागपूर विमानतळावर उतरले नागपूर : रविवारी सायंकाळी आपात्‌स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात ...

- शारजाह-बांगलादेश विमान : आपात्‌स्थितीत नागपूर विमानतळावर उतरले

नागपूर : रविवारी सायंकाळी आपात्‌स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आलेले विमान बऱ्याच प्रयत्नानंतर दुरुस्त न झाल्यानंतर विमानातील प्रवासी सोमवारी सकाळी दुसऱ्या विमानाने बांगलादेशच्या चटगाव येथे रवाना झाले. हे प्रवासी रात्रभर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत थांबले होते.

एअर अरेबियाचे शारजाह येथून बांगलादेशच्या चटगाव येथे जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर रविवारी सायंकाळी नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले होते. विमानात १२९ प्रवासी होते. एअरलाईन्सने दुसरे विमान पाठवून प्रवाशांना चटगावला नेण्यात आले. दुसरे विमान शारजाह येथून सकाळी ८.३० वाजता नागपुरात पोहोचले आणि सकाळी ११.२५ वाजता चटगावला रवाना झाले.

आपात्‌स्थितीत विमानाचे लॅण्डिंग झाल्यानंतर एअरलाईन्सच्या निर्णयानुसार प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात येते. पण कंपनीने प्रवाशांना विमानतळाच्या टर्मिनलमध्ये थांबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. एअरलाईन्सच्या या निर्णयावर अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु प्रवाशांच्या नाश्ता व जेवणाची व्यवस्था कंपनीने केली होती.