नागपूर शहर आणि जिल्ह्यात लसीकरण ४० लाखांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 10:37 AM2021-10-14T10:37:50+5:302021-10-14T12:00:28+5:30

नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये ४० लाखांच्या वर कोरोना लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात २७ लाख ६० हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर, १२ लाख ४२ हजार नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले. हा टप्पा गाठणारा नागपूर राज्यातील पाचवा जिल्हा आहे.

Over 40 lakh vaccinations in Nagpur city and district | नागपूर शहर आणि जिल्ह्यात लसीकरण ४० लाखांच्या पार

नागपूर शहर आणि जिल्ह्यात लसीकरण ४० लाखांच्या पार

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेलाही नागरिकांचा प्रतिसाद४० लाखांचा लसीकरणाचा टप्पा गाठणारा नागपूर हा राज्यात पाचवा जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :नागपूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख ३ हजार २५१ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. शहर व जिल्ह्यातील ४३० कोविड केंद्रावर लसीकरण सुरू आहे. २७ लाख ६० हजार ६३८ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला, तर १२ लाख ४२ हजार ६१३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ४० लाखांचा लसीकरणाचा टप्पा गाठणारा नागपूर हा राज्यात पाचवा जिल्हा आहे.

जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांना लसीकरण करण्यात आले. टप्प्या-टप्प्याने ६० वर्षांवरील, ४५ वर्षांवरील व १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ७०.४३ टक्के इतकी १८ वर्षांवरील लोकसंख्या आहे. त्या प्रमाणात राज्याकडून उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्याला ५०,९५,४०५ इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. आरोग्य व इतर विभागांच्या समन्वयाने लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. गावपातळीवर आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तलाठी आदींच्या समन्वयाने लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

पाच प्रमुख शहरातील लसीकरण

मुंबई १,३८,२७,७५०

पुणे १,१३,६०,२८७

ठाणे ७३,३२,७५५

नाशिक ४२,४९,२४८

नागपूर ४०,२१,६०५

कवच कुंडल मोहिमेत ७८,२४० जणांना डोस 

राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन कवच कुंडल’ (mission kavach kundal)  मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत ८ ते १२ ऑक्टोबरदरम्यान ३७,०४७ नागरिकांनी पहिला, तर ४१,१९३ नागरिकांनी दुसरा असे एकूण ७८,२४० जणांना लसीकरणाचे दोन्ही डोस देण्यात आले. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. संसर्गापासून बचावाचे लसीकरण हेच मोठे शस्त्र आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेऊन मनपाच्या १५५ लसीकरण केंद्रांपैकी आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन आपले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Web Title: Over 40 lakh vaccinations in Nagpur city and district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.