शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘वनामती’ च्या बचावासाठी संघटना आक्रमक

By admin | Updated: July 13, 2015 02:38 IST

कृषी विभागाचे भूषण असलेल्या उपराजधानीतील ‘वनामती’ संस्थेच्या बचावासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत.

आंदोलनाचा इशारा : १२३ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात नागपूर : कृषी विभागाचे भूषण असलेल्या उपराजधानीतील ‘वनामती’ संस्थेच्या बचावासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. ‘वनामती’ ही कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी असलेली राज्यातील शिखर संस्था आहे. परंतु राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ही संस्था कृषी विभागाकडून महसूल विभागाच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या या तुघलकी निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघाच्यावतीने रविवारी तातडीची बैठक घेऊ न, त्यात सामान्य प्रशासन विभागाचा हा डाव हाणून पाडण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. राजाबाक्षा येथील श्री संत गाडगे महाराज स्मारक धर्मशाळेच्या सभागृहात ही बैठक पार पडली. यात कोणत्याही परिस्थितीत ‘वनामती’ संस्था कृषी विभागाच्या हातून जाऊ दिली जाणार नाही, असा एकमताने निर्णय घेऊ न त्यासाठी गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. महासंघाचे कार्याध्यक्ष एन. एस. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला संघटनेचे सरचिटणीस मुकुंद पालटकर, विजय तपाडकर, एस. बी. इंगोले व महादेव ठाकरे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाच्या या अफलातून निर्णयामुळे कृषी खात्याच्या येथील जमिनीसह वसतिगृहे, प्रशिक्षण केंद्रे, अधिकाऱ्यांची निवासस्थाने व सभागृह महसूल विभागाच्या ताब्यात जाणार आहेत. शिवाय यामुळे कृषी विभागातील सुमारे १२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. यात एक संचालक पदासह तीन अप्पर संचालक, तीन उपसंचालक, एक वरिष्ठ प्रशासन अधिकारी, सात प्राचार्य, २१ सहसंचालक, सात सहायक प्रशासन अधिकारी, १४ कृषी पर्यवेक्षक, आठ वरिष्ठ लिपिक, ११ लघुलेखक, आठ लिपिक, एक सहायक ग्रंथपाल, १७ वाहनचालक, दोन संगणक चालक, १७ शिपाई व दोन वॉचमन पदांचा समावेश राहणार आहे. प्रशिक्षणाचा व्याप लक्षात घेता येथे सुमारे ३०० ते ३४० पदांची गरज आहे. मात्र येथील मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर येथील प्रशिक्षणाचा डोलारा उभा आहे. असे असताना येथील राजपत्रित दर्जाच्या वरिष्ठ पदांवर कृषी विभागाच्या बाहेरील अधिकाऱ्यांना बसविले जात आहेत.(प्रतिनिधी)कृषी विभागावर अन्याय ‘वनामती’ ही कृषी विभागाची महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे ही संस्था महसूल विभागाच्या हाती देणे, म्हणजे कृषी विभागावर अन्याय आहे. कृषी महासंघ एवढ्या सहजरीत्या ती महसूल विभागाच्या हाती जाऊ देणार नाही. मग त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल. ‘वनामती’ या संस्थेच्या अधिपत्याखाली राज्यातील इतर आठ प्रादेशिक संस्था आहेत. त्यामुळे एक ‘वनामती’ महसूल खात्याकडे वर्ग करणे म्हणजे राज्यातील आठही प्रादेशिक संस्था सरळसरळ महसूल खात्याच्या हाती जाणार आहेत. - मुकुंद पालटकर सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ