शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन याकूब

By admin | Updated: July 29, 2015 03:13 IST

सर्वोच्च न्यायालयात याकूब मेमनच्या याचिकेवर मंगळवारीदेखील निर्णय झाला नाही.

स्थानिक यंत्रणा आणखी अस्वस्थ : आता बुधवारकडे लक्ष नागपूर : सर्वोच्च न्यायालयात याकूब मेमनच्या याचिकेवर मंगळवारीदेखील निर्णय झाला नाही. ही याचिका सुनावणीसाठी आता वरिष्ठ न्यायपीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे ‘आॅपरेशन याकूब‘मध्ये गुंतलेली स्थानिक यंत्रणा आणखी अस्वस्थ झाली आहे. बुधवारी आता काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याकूबचा नातेवाईक उस्मान मेमन याने मंगळवारी पुन्हा कारागृहात जाऊन याकूबची भेट घेण्याचा प्रयत्न केला.२१ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने याकूबची क्युरेटीव्ह पिटीशन खारीज केली. याच दिवशी याकूबने राज्यपालांकडे दयेचा अर्ज सादर केला. तर, क्युरेटीव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयात दाखल असतानाच डेथ वॉरंट काढण्यात आल्यामुळे तो बेकायदेशीर असल्याचे सांगून फाशी टाळण्यासाठी त्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. त्यामुळे ‘आॅपरेशन याकूब‘च्या अंमलबजावणीच्या तयारीत गुंतलेल्या यंत्रणेसह जनसामान्यांचेही लक्ष आजच्या सुनावणीकडे वेधले गेले होते. मात्र, न्यायमूर्तीद्वयांकडून मतभिन्नता नोंदवल्या गेल्यामुळे ही याचिका वरिष्ठ न्यायपीठाकडे वर्ग झाली. परिणामी स्थानिक यंत्रणा आणखी अस्वस्थ झाली आहे. दुसरीकडे याकूबचा नातेवाईक उस्मान मेमन आज दुपारी ४.१५ च्या सुमारास कारागृहात गेला. त्याने याकूबची प्रदीर्घ भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारागृह परिसरात आणि बाहेरही पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला होता. पोलिसांचे विशेष सशस्त्र पथक बाहेरच्यांवर नजर ठेवून होते. राहाटे कॉलनीकडून येणाऱ्या मार्गावर असलेल्या कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी बॅरिकेटस लावले होते. संशयित व्यक्ती आणि वाहनाचा ते कसून तपास करीत होते.(प्रतिनिधी)