शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन मुस्कान

By admin | Updated: January 12, 2016 03:13 IST

जुलै २०१५ मध्ये नागपूरात राबविण्यात आलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये शहर पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक नागपूर : जुलै २०१५ मध्ये नागपूरात राबविण्यात आलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये शहर पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांचा सत्कार केला.मिनिस्ट्री आॅफ होम अफेअर्स नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार हरविलेल्या मुलांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्रात १ जुलै ते ३१ जुलै २०१५ दरम्यान ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. उपराजधानीतही ही मोहीम राबवून महिनाभरात ३४ अल्पवयीन मुले, १०९ मुली, २१३ पुरुष आणि २५५ स्त्रिया असे एकूण ६११ बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात आले. शहरातील १४३ बालकांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे ही बालके आता समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात आली आहे. शहर पोलिसांच्या या बहुमोल कामगिरीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. पुण्यात सत्कार त्यांनी पुणे येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ निरीक्षक बाजीराव पवार, एपीआय अमिता जयपूरकर, सुनीता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, शहर पोलीस दलासह मुख्यालयातील २० अंमलदारांनी या मोहिमेत विशेष कामगिरी बजावली. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती.