शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी धनगर समाजाला आरक्षण नाकारल्याच्या केवळ अफवा

By admin | Updated: April 2, 2017 02:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीला आपण स्वत: उपस्थित होतो.

मुख्यमंत्री धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक : विकास महात्मे यांची माहिती नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीला आपण स्वत: उपस्थित होतो. त्या सभेत धनगर आरक्षणाच्या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी धनगर समाजाला आरक्षण नाकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. या सर्व केवळ अफवा आहेत. धनगर समाज बांधवांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी एका पत्रकार परिषदेत केले. ते पुढे म्हणाले, राज्यात टीआयएसएसचा अत्यंत व्यवस्थित सर्वे सुरू आहे. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मात्र आपण जे घडलेच नाही, त्यावर चर्चा करीत आहोत आणि ज्या सकारात्मक बाबी घडल्या त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजपर्यंत कधीच एकाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत छातीठोकपणे ‘धनगर आरक्षण’ या विषयावर भाष्य केले नव्हते, मात्र देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी विधानसभेत ते सांगितले. नुकत्याच ११ मार्च रोजी आपण धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. त्या बैठकीत टीआयएसएसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आदिवासी विभागाच्या प्रमुख सचिव सुद्धा उपस्थित होत्या. यात टीआयएसएसकडून होत असलेल्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करताच, मुख्यमंत्र्यांनी अहवाल ताबडतोब देण्याचे निर्देश दिले. डिसेंबर ऐवजी नोव्हेंबरमध्येच सर्वे पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. धनगर समाजाबाबत मागील ६५ वर्षांत प्रथमच एवढ्या सकारात्मक गोष्टी घडत आहे. त्यामुळे समाज बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे त्यांनी पुन्हा आवाहन केले. खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला ही चांगली गोष्ट आहे. पण यासोबतच मला काही प्रश्नही पडले आहेत, इतके वर्षे आपण सत्तेत असताना धनगर आरक्षणाची कधीच आठवण का झाली नाही? धनगर आरक्षणाला समर्थन तर दूरच याउलट केंद्र सरकारकडे नकारात्मक अहवाल पाठवून कोंडी केली. त्यामुळेच आज टीआयएसएसच्या माध्यमातून हा सर्वे करावा लागत आहे. आपल्याच पक्षाचे आदिवासी मंत्री मधुकर पिचड होते, तेव्हा कधीच धनगर आरक्षणाचा पुळका का आला नाही, असाही यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला.(प्रतिनिधी)