शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय केंद्रांवरून १२ व १४ एप्रिलला होणार फक्त ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआरची व्यवस्था लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. ...

आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआरची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवारी १२ एप्रिल आणि बुधवारी १४ एप्रिल रोजी सर्व शासकीय चाचणी केंद्रांवरून केवळ ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ करण्यात येणार आहे. तसेच १३ एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त चाचणी केंद्रे बंद राहतील.

कोविड चाचणी केल्यानंतर तातडीने अहवाल प्राप्त झाल्यास पॉझिटिव्ह रुग्णांना पुढील उपचार घेणे सोयीचे होते. मात्र सध्या चाचण्यांची संख्या वाढल्याने परीक्षण करणाऱ्या मेडिकल, मेयो, एम्स, आरटीएमएनयू येथील प्रयोगशाळांवरील भार वाढला आहे. त्यामुळे चाचणी अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांकडे असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि नव्या संभाव्य रुग्णांपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी सोमवार १२ एप्रिल व बुधवार १४ एप्रिल रोजी सर्व ४२ शासकीय चाचणी केंद्रांवरून केवळ ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन्‌ बी. यांनी दिली.

या चाचणीचा लेखी अहवाल रुग्णांना त्याच केंद्रावरून उपलब्ध होऊ शकेल. ज्यांना लक्षणे आहेत, मात्र रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आले असतील, अशा व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचणीची विशेष व्यवस्था करण्यात येईल. अँटिजेन टेस्टचे प्राप्त अहवाल त्याचवेळी आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देशही मनपा आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत.