शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे अधिकारी २६ व २७ रोजी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:23 IST

विविध राष्ट्रियीकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रियीकृत बँकांचे अधिकारी २६ आणि २७ सप्टेंबरला संपावर जाणार आहे. त्यामुळे बँकिंग व्यवहार ठप्प होणार आहे.

ठळक मुद्देविलिनीकरणाचा विरोध : बँकिंग व्यवहार बंद राहणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विविध राष्ट्रियीकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रियीकृत बँकांचे अधिकारी २६ आणि २७ सप्टेंबरला संपावर जाणार आहे. त्यामुळे बँकिंग व्यवहार ठप्प होणार आहे.संपासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशनच्या (एआयबीओसी) नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष अनिल खपरिया यांनी शासनाच्या धोरणाला दोष दिला आहे. बँकेचे अधिकारी विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. हा निर्णय मागे घेण्यासह अधिकाऱ्यांच्या पगाराचे पुनरीक्षण, मोठ्या कर्जदारांना कर्जमाफी देण्याऐवजी एनपीए खात्याची वसुली करून त्याचा फायदा छोट्या कर्जदारांना देणे, अतिरिक्त शुल्क वसुली बंद करावी आणि बँकांचे व्यवहार आठवड्यातून पाच दिवस करण्याची एआयबीओसीची मागणी आहे. या मागण्यांसाठी एआयबीओसीच्या बॅनरखाली नागपूर चॅप्टरशी जुळलेले विविध राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी २६ आणि २७ सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यांच्याकडे बँकांचे अधिकार असल्यामुळे या दिवसात व्यवहार होणार नाहीत.दुसरीकडे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने बँकांचे विलिनीकरण न करण्याच्या मागणीसाठी २२ ऑक्टोबरला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सिंंडिकेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही शुक्रवारी विलिनीकरणाच्या विरोधात आणि अन्य मागण्यांसाठी निदर्शने केली.बँकिंग व्यवहार राहणार ठप्पबँक अधिकाºयांचा २६ आणि २७ सप्टेंबरला संप, २८ ला चौथा शनिवार आणि २९ ला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. त्यानंतर ३० सप्टेंबरला बँकेच्या अर्धवार्षिक लेखा व्यवहारात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त राहतील. २ ऑक्टोबरला गांधी जयंती असल्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. अर्थात २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान बँकांचे व्यवहार बंद राहिल्याचा त्रास ग्राहकांना होणार आहे. याशिवाय सर्वच बँकांच्या एटीएममध्ये रोखीअभावी ग्राहकांना स्वत:च्या व्यवहारावर निर्बंध आणावे लागतील. अधिकाऱ्यांनी सलग सुट्यांचे नियोजन करून २६ आणि २७ सप्टेंबरला जाणीवपूर्वक संप पुकारल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या एकतर्फी निर्णयामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.संघटनांच्या मागण्या

  •  बँकांचे विलिनीकरण करू नये
  •  पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा
  •  रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी
  • वेतन आणि पगारात बदल करावे
  •  ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी
  •  आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावे
  •  एनपीएस रद्द करावा
  •  बँकांमध्ये नोकरभरती करावी
टॅग्स :bankबँकEmployeeकर्मचारीStrikeसंप