शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाताळानिमित्त मध्य रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल

By admin | Updated: November 14, 2014 22:50 IST

दक्षिण मध्यच्या गाड्यांवरही गर्दी वाढली.

अकोला : नाताळानिमित्त २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून, दिवाळीच्या तुलनेत नाताळातील सुट्यांमध्ये प्रवासाचे नियोजन करणार्‍यांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ अधिकार्‍यांनी दिली. विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वीच आटोपली; मात्र तरीही दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेकांनी प्रवास टाळला. डिसेंबरमध्ये नाताळाच्या सुट्या इच्छित स् थळी घालविण्याचा बेत आखणार्‍यांनी दोन महिने आधीच आरक्षण केले आहे. परिणामी, २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान मुंबई, पुणे, अहमदाबाद, नागपूर, हावडा, भूसावळ, अकोला व नागपूर जंक्शन रेल्वे स्थानकांवरून धावणार्‍या सर्व सु परफास्ट गाड्यांचे आरक्षण झाले असतानाही, प्रवाशांनी आरक्षणाची मागणी केल्याने त्यांना प्रतिक्षा यादीमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती भूसावळ मंडळ अधिकार्‍यांनी दिली. *द. मध्यच्या गाड्यांवर गर्दी वाढलीमध्य रेल्वेप्रमाणेच दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला मार्गे धावणार्‍या गाड्यांची सं ख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे गाड्या बदलण्याचा त्रास राहिला नसल्याने थेट अकोल्याहून प्रवास सुरू करणार्‍यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत चालली आहे. लांब पल्ल्याच्या या मार्गावर अनेक गाड्या सुरू झाल्याने नवीन-नवीन ठिकाणांना भेटी देण्यासाठी आतूर असलेल्या वैदर्भीयांनी द. मध्यच्या गाड्यांचा कोटादेखील नाताळाच्या सुट्यांमध्ये पूर्ण केला असल्याची माहिती द. मध्यच्या नांदेड येथील मंडळ अधिकार्‍यांनी दिली. आगामी काळात मध्य व दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने आणखी काही गाड्या ठराविक कालावधीसाठी सुरू होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगि तले.