आता फोटो काढून साहित्य जप्त करणार

By Admin | Updated: April 6, 2016 03:10 IST2016-04-06T03:10:36+5:302016-04-06T03:10:36+5:30

सीताबर्डी मुख्य मार्गावर हॉकर्ससोबतच काही व्यापारी दुकानापुढे साहित्य ठेवतात. त्यामुळे या मार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण होतो.

Now take photos and seize the materials | आता फोटो काढून साहित्य जप्त करणार

आता फोटो काढून साहित्य जप्त करणार

सीताबर्डीतील व्यापाऱ्यांना तंबी : दंगल नियंत्रण पथकासह निरीक्षण
नागपूर : सीताबर्डी मुख्य मार्गावर हॉकर्ससोबतच काही व्यापारी दुकानापुढे साहित्य ठेवतात. त्यामुळे या मार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दुकानापुढे साहित्य ठेवल्यास ते जप्त करण्याची तंबी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी दंगल नियंत्रण पथकासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुकानापुढे साहित्य न ठेवण्याची ताकीद दिली. दुकानदारांनी अतिक्रमण करू नये यासाठी दुकानापुढे साहित्य ठेवल्याचे फोटो काढून ते जप्त केले जाणार आहे. या मार्गावर मंगळवारी सकाळी १० पासून पोलीस जवानांसह अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे हॉकर्स या मार्गाकडे फिरकले नाहीत. सायंकाळी धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांनी दंगल नियंत्रण पथकासह व्हेरायटी चौक ते लोखंडी पूल या मार्गाची पाहणी केली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान या मार्गावर पथक तैनात क रण्याची योजना तयार केली आहे. सकाळी १० ते ३ दरम्यान झोनचे पथक तर दुपारी ३ ते रात्री ८ या वेळात केंद्रीय पथक तैनात राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now take photos and seize the materials