...आता श्वासातूनच होणार मधुमेह तपासणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:16 IST2026-04-16T10:16:20+5:302026-04-16T10:16:53+5:30

Health Update: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी श्वासाच्या माध्यमातून मधुमेह तपासणी करणारे अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे रक्त काढण्यासाठी सुई टोचण्याची भीती आता इतिहासजमा होणार आहे.

...Now diabetes will be tested through breath! | ...आता श्वासातूनच होणार मधुमेह तपासणी!

...आता श्वासातूनच होणार मधुमेह तपासणी!

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी श्वासाच्या माध्यमातून मधुमेह तपासणी करणारे अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे रक्त काढण्यासाठी सुई टोचण्याची भीती आता इतिहासजमा होणार आहे. या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटिस मॉनिटरिंग डिवाइस’ला यूके डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.
मधुमेह तपासणीत पारंपरिक पद्धतीत सुईद्वारे रक्ताचे नमुने घेण्याची प्रक्रिया रुग्णांसाठी त्रासदायक ठरते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातील संशोधकांनी नावीन्यपूर्ण पर्याय विकसित केला आहे.

काय आहे संशोधन? 
संशोधकांनी तयार केलेल्या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटिस मॉनिटरिंग डिवाइस’च्या साहाय्याने आता श्वासाचे विश्लेषण करून रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण मोजता येणार आहे.  
उपकरणाची अचूकता आणि व्यावहारिक उपयोगिता अधिक वाढवण्यासाठी कॅलिब्रेशन आणि व्हॅलिडेशन प्रक्रिया सुरू आहे. येत्या काळात हे उपकरण सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.

कुणी केले संशोधन?
या प्रकल्पात पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा धुर्वे, हर्ष तिवारी आणि सबरीन बानो मोहम्मद जावेद मन्सुरी यांचे प्रमुख योगदान आहे. 
याशिवाय बालाघाट येथील शासकीय जेएसटीपीजी महाविद्यालयाचे डॉ. दुर्गेश आगासे, नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. रश्मी दिलीप उरकुडे, डॉ. अंकित काळे, बालाघाट येथील शासकीय कमला नेहरू महिला महाविद्यालयाच्या डॉ. तनुश्री आगासे, इरा दिलीप उरकुडे (ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन, आयर्लंड) यांचेही योगदान आहे.
या प्रकल्पातून आंतरसंस्थात्मक तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. 

या उपकरणाची संकल्पना ‘आविष्कार संशोधन महोत्सव २०२४’मध्ये सादर करण्यात आली होती. हर्ष तिवारी यांच्या प्रकल्पाला पुरस्कारही मिळाला होता. 

Web Title : सांस से मधुमेह परीक्षण: अब बिना सुई के संभव!

Web Summary : नागपुर के शोधकर्ताओं ने सांस आधारित मधुमेह परीक्षण विकसित किया, जिससे रक्त के नमूनों की आवश्यकता समाप्त हो गई। यह गैर-आक्रामक उपकरण ग्लूकोज के स्तर को मापने के लिए सांस का विश्लेषण करता है। अंशांकन चल रहा है, जल्द ही व्यापक पहुंच का वादा है। इस परियोजना में अंतर-संस्थागत और अंतर्राष्ट्रीय सहयोग शामिल था, जो मधुमेह निगरानी में नवाचार का प्रदर्शन करता है।

Web Title : Breath Test Revolution: Diabetes Detection Without Needles Now Possible!

Web Summary : Nagpur researchers developed a breath-based diabetes test, eliminating the need for blood samples. This non-invasive device analyzes breath to measure glucose levels. Calibration is underway, promising wider accessibility soon. The project involved inter-institutional and international collaboration, showcasing innovation in diabetes monitoring.