शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

'जुनी पेन्शन योजना नाहीच,'... तर सरकार दिवाळखोरीत जाण्याची भीती : फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 06:07 IST

जुनी पेन्शन योजना कदापि लागू केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले.

नागपूर : राज्यात २००५ साली पेन्शन योजना बंद झाली असून, जुनी पेन्शन योजना कदापि लागू केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. जुनी पेन्शन योजना लागू करायची झाली तर राज्यावर १ लाख १० हजार कोटी रुपयांचा बोजा येईल. त्यामुळे हे राज्यच दिवाळखोरीत जाईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.   

राज्यातील विनाअनुदान तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान सूत्र लागू करण्याबाबत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत फडणवीस म्हणाले की, २०१९ साली कायम विनाअनुदानित शाळांना दिले जाणारे अनुदान २० टक्क्यांवरून ४० टक्के देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राज्यात अशा ३५० शाळा होत्या. अनुदान वाढीचा निर्णय आता अंमलबजावणीला आला, तेव्हा त्या शाळांची संख्या वाढून ३९०० एवढी झाली आहे. या अनुदानाचा आता ११०० कोटींचा बोजा असून पुढच्या तीन वर्षात हा ५ हजार कोटींवर जाऊ शकतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून याबाबत आपल्याला विचार करावा लागेल. आता काही शाळा म्हणतात त्रुटी राहिली आहे, मात्र आता कुणालाही संधी मिळणार नाही. यापुढे आपल्याला अनुदानित शाळा देता येणार नाहीत, स्वयंअर्थसाहाय्यित शाळाच दिल्या जातील.     देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

भीक मागितली तर चालेल का : भुजबळ 

  • पुरेशा शाळा आणि शिक्षण देण्याची व्यवस्था सरकारकडून होत नाही. त्यामुळे स्वयंसेवी संस्था अनुदानित शाळा काढतात. शाळा काढल्यानंतर खर्च आणि शिक्षणाचा पगार भागवावा लागतो. 
  • भीक मागून या शाळांनी खर्च भागवला तर त्याला परवानगी आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी विचारला. तेव्हा सभागृहात उपस्थित असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याकडे असलेले प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक फडणवीसांकडे दिले. 
  • या पुस्तकाचा दाखला देत प्रबोधनकारांनी लिहिले आहे, कसे आम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांना सोबत घेऊन झोळी घेऊन लोकांकडे गेलो आणि भीक मागितली. पण कुणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही, राज्य सरकार काळजी घेईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनPensionनिवृत्ती वेतन