शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे कुठलेही राजकीय पद स्वीकारणार नाही

By admin | Updated: November 22, 2015 03:07 IST

यापुढे आपण कुठलेही राजकीय पद घेणार नाही आणि निवडणूकही लढणार नाही, अशी घोषणा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या मुख्य संयोजिका माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे ...

निवडणूकही लढणार नाही : सुलेखा कुंभारे यांची घोषणानागपूर : यापुढे आपण कुठलेही राजकीय पद घेणार नाही आणि निवडणूकही लढणार नाही, अशी घोषणा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या मुख्य संयोजिका माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी केली. परंतु राजकारण मात्र सोडणार नाही, कार्यकर्त्यांच्या व समाजाच्या हक्कासाठी आपण लढत राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शनिवारी रविभवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना राजकारणासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले, राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. त्यात मंत्रिपद स्वीकारण्यासाठी आपल्यालाही आॅफर आहे. परंतु मी ती आॅफर नाकारली आहे. कारण आता मी कुठलेही राजकीय पद न घेण्याचा निर्णय घेतला आहे. समाजकारण आणि धम्माच्या कामाला मी आपले उर्वरित आयुष्य घालवणार आहे. परंतु याचा अर्थ मी राजकारणातून संन्यास घेत आहे असा नाही. मी राजकारणातच राहील. कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या न्यायासाठी लढत राहील. बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपाइं पुन्हा नव्याने निर्माण होईल, याची मला खात्री आहे, त्यामुळे मी रिपाइंला एकजूट करण्याचे काम करीत राहील. यापुढे आपण राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावू, असेही सुलेखा कुंभारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)