शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ जनावरांची सुटका

By admin | Updated: August 20, 2016 02:29 IST

पोलिसांनी मौदा तालुक्यातील चाचेर शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले.

आरोपीस अटक : अडीच लाखांचा ऐवज जप्त रामटेक : पोलिसांनी मौदा तालुक्यातील चाचेर शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईमध्ये नऊ जनावरांची सुटका करीत आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. रियाज अब्दुल सैयद कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या व आशिफ युसूफ शेख (३०) असे फरार आरोपीचे नाव आहे. दोघेही कामठी येथील रहिवासी आहेत. रामटेक पोलिसांचे पथक मौदा तालुक्यात गस्तीवर होते. दरम्यान, जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी चाचेर शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. त्यात एमएच-४०/वाय-४१५८ क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनात नऊ जनावरे कोंबली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात या जनावरांची वाहतूक विना परवानगी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी वाहनातील दोघांना अटक करून वाहनासह जनावरे जप्त केली. या कारवाईमध्ये ४५ हजार रुपये किमतीची जनावरे आणि दोन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)