शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

निकम गिट्टीखदानमध्ये, नंदनवार नियंत्रण कक्षात

By admin | Updated: January 15, 2016 03:29 IST

शहर पोलीस दलातील पाच पोलीस ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. यातील तीन ठाणेदारांना इकडून तिकडे फिरविण्यात आले तर, एकाला पदोन्नत करण्यात आले.

पाच ठाणेदारांच्या बदल्या : काही प्रतीक्षा यादीतनागपूर : शहर पोलीस दलातील पाच पोलीस ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. यातील तीन ठाणेदारांना इकडून तिकडे फिरविण्यात आले तर, एकाला पदोन्नत करण्यात आले. विशेष म्हणजे, आणखी काही पोलीस निरीक्षकांच्या लवकरच बदल्या होणार असून, त्यांची प्रतीक्षा यादीही तयार असल्याचे समजते.गेल्या आठवड्यात पाचपावली पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच मागण्याच्या आरोपावरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातल्यात्यात या लाचप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गावंडेसह ठाण्यातील तीन जणांची नावे आल्याने पाचपावली ठाण्यात भूकंप आला होता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी ठाणेदार राजेंद्र दिनकरराव निकम यांची गिट्टीखदान ठाण्यात बदली करण्यात आली. गिट्टीखदानचे ठाणेदार अवधेश त्रिपाठी यांना नुकतीच पदोन्नती मिळाली. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेची जबाबदारी निकम यांना सोपविण्यात आली. नंदनवन ठाण्यातही एका उपनिरीक्षकाने एका निर्दोष तरुणाला धाक दाखवून लाच मागितली अन् पकडला गेला. या घटनेमुळे नंदनवन ठाण्यातील कारभारही वरिष्ठांना खटकला. त्यामुळे येथील ठाणेदार सुधीर पुंडलिकराव नंदनवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर अजनीचे ठाणेदार सुनील दशरथ महाडिक यांची बदली करण्यात आली. गुन्हेगारांचे माहेरघर असलेले अजनी पोलीस ठाणे महाडिक यांनी पद्धतशीर हाताळले. त्याचमुळे त्यांना नंदनवनची जबाबदारी सोपविण्यात आली. तर, महाडिक यांच्या जागेवर अजनीतीलच द्वितीय निरीक्षक सांदीपान वसंतराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. पवार यांना ठाणेदारकी बहाल करतानाच विशेष शाखेत असलेले पोलीस निरीक्षक अशोक श्रावण बागुल यांनाही जरीपटका पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली. तेथील ठाणेदार संजय सांगोळे यांची गडचिरोलीला बदली झाली आहे. जरीपटक्यातील अल्पवयीन भावंडाचे अपहरण, बलात्कार आणि हत्याकांड तसेच अन्य काही घटनांमुळे जरीपटक्याचा कारभारही वरिष्ठांसाठी मनस्तापाचा विषय ठरला होता. त्याचप्रमाणे नंदनवनचे द्वितीय निरीक्षक चंद्रशेखर मनोहर कदम यांना सक्करदरा येथे राठोड यांच्या रिक्त जागेवर नियुक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)पाचपावली ठाणे रिक्त विशेष म्हणजे, पाचपावलीच्या ठाणेदाराची बदली करण्यात आली तरी तेथे नवीन ठाणेदार कोण, ते स्पष्ट झाले नाही. त्याचप्रमाणे कोतवालीचे ठाणेदार सुरेश भोयर यांनाही पदोन्नती मिळाली. मात्र, बदलीच्या यादीत त्यांचे आज नाव आले नाही. आणखी काही ठाणेदारांबाबत एक-दोन दिवसात निर्णय होणार आहे.