शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारपासून सुरू होणार वृत्तपत्र वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 20:29 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये नेमकी माहिती जाणे आवश्यक आहे. त्यामुळेच शुक्रवारपासून शहरात वृत्तपत्रांचे वितरण सुरू होणार आहे. यासंदर्भात विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व हॉकर्सची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देविदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व हॉकर्सची बैठक : पालकमंत्रीदेखील उपस्थित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये नेमकी माहिती जाणे आवश्यक आहे. त्यामुळेच शुक्रवारपासून शहरात वृत्तपत्रांचे वितरण सुरू होणार आहे. यासंदर्भात विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व हॉकर्सची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. वृत्तपत्रांचे वितरण आवश्यक असून हॉकर्सनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी केले.विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, विदर्भ डेली न्यूज पेपर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृण चांडक, नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, माहिती संचालक हेमराज बागुल, दैनिक हितवादचे राजेंद्र पुरोहित, दैनिक नवभारतचे निमिष माहेश्वरी, दैनिक भास्करचे सुमित अग्रवाल, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी प्रामुख्याने उपस्थित होते.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन वृत्तपत्राचे वितरण सुरू करावे. वृत्तपत्र वितरण करताना संसंर्ग टाळण्याच्या दृष्टीने साबणाने हात धुणे, मास्क लावणे त्यासोबत योग्य अंतर ठेवणे आदी खबरदारी आवश्यक आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व केंद्रांवर अंतर ठेवण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले.याप्रसंगी हॉकर्स प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. सद्यस्थितीत हॉकर्स प्रतिनिधींची स्वत:ची सुरक्षा, तसेच कॉलनी, अपार्टमेंट इतर भागातील नागरिकांनी वृत्तपत्रे घेण्यास दिलेला नकार हे मुद्दे मांडले. हॉकर्सला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक काळजी घ्यावी लागणार आहे. वृत्तपत्र वितरणाच्या वेळी सामाजिक अंतर ठेवावे लागेल, चौकात वितरण करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खात्री करून घ्यावी लागेल.नागरिकांनी वृत्तपत्र विक्रेत्याला येऊ द्यावेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता वृत्तपत्र हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. वृत्तपत्रामुळे ‘कोरोना’ होत नाही. त्यामुळे जनतेने आपल्या घरी वृत्तपत्र विक्रेत्याला येऊ द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. हॉकर्स प्रतिनिधींच्या वैयक्तिक आरोग्यासंदर्भात वृत्तपत्र मालकांनी बैठक घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा प्रदान करावी. हॉकर्स प्रतिनिधींच्या सुरक्षाविषयक कामकाजाविषयक स्थानिक स्वरूपाच्या मागण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल, असे त्यांनी निर्देश दिले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतnagpurनागपूर