शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा नवा विक्रम: आज पुन्हा बंद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST

एकाच दिवशी ३०,६९४ लाभार्थींना लस : लसीकरणासाठी केंद्रावर रांगा : गर्दीमुळे अनेक डोस न घेता अनेक परतले ...

एकाच दिवशी ३०,६९४ लाभार्थींना लस : लसीकरणासाठी केंद्रावर रांगा : गर्दीमुळे अनेक डोस न घेता अनेक परतले

नागपूर : शहरातील १४३ केंद्रांवर शनिवारी लसीकरण करण्यात आले. चार दिवसांनंतर डोस उपलब्ध झाल्याने केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच दिवशी नागपूर शहरात ३०,६९४ लाभार्थींना लस देण्याचा नवा विक्रम करण्यात आला. शासकीय रुग्णालयात २७,६०४ लाभार्थींना तर खासगी रुग्णालयात ३,०८६ लाभार्थींना लस देण्यात आली.

लसीकरणाचा नवा विक्रम झाला असतानाच काही केंद्रांवर २५० ते ३०० नागरिक लसीकरणासाठी रांगेत उभे होते. त्या प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने डोस न घेता अनेकांना परत जावे लागले. लसीकरण न झालेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणीद्वारे हे लसीकरण करण्यात आले. याशिवाय तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिनची लस देण्यात आली.

...

आज पुन्हा लसीकरण बंद

शनिवारी सायंकाळपर्यंत शासनाकडून नवीन डोस उपलब्ध न झाल्याने रविवारी पुन्हा लसीकरण बंद राहणार आहे. नागपुरात १८ पेक्षा अधिक वयोगटाचे लसीकरण २३ जूनपासून सुरू झाले. मात्र, या ११ दिवसांत ६ दिवस लसीकरण बंदच होते. शहरात २५ जून, २७ जून, २९ जून, ३० जून आणि १ व २ जुलै लसीकरण बंद होते. पुन्हा ४ जुलैला बंद राहणार आहे.

...

मनपा मुख्यालयापुढे आंदोलन

मनपाकडून १४३ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काही केंद्रांवर लसीकरण सुविधाच नव्हती, तर काही केंद्रांवर दुपारी १२.३० पर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. अनेक केंद्रांवर सुमारे २५० ते ३०० लोकांची गर्दी जमली होती. मनपाच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात नागपूर एसओएस (सेव्ह अवर सोल्स)च्या स्वयंसेवकांनी शनिवारी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर बंटी शेळके आणि तौसिफ खान यांच्या मार्गदर्शनात आणि सागर चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

....

अनेक केंद्रावर १२.३० डोस उपलब्ध नव्हते.

केटीनगर यूपीएचसी येथे लसीकरणासाठी नागरिक सकाळी ६.३० पासून रांगेत असताना येथे दुपारी १२.३० पर्यंत एकाही नागरिकाला लस देण्यात आली नव्हती. तर, जगदीश नगर समाज भवन सभागृह येथेही अशीच परिस्थिती होती. शहरातील विविध केंद्रांवर एसओएसच्या तरुणांनी भेट दिली असता असाच प्रकार निदर्शनास आला. मनपाने वेळीच दखल घ्यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे एसओएसचे बंटी शेळके यांनी सांगितले.

....