शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

थकबाकी भरल्यावरच नवीन वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:11 AM

जुनी थकबाकी भरल्यावरच विजेचे नवीन कनेक्शन दिले जाईल. थकबाकीमुळे वीजपुरवठा पूर्णपणे कापला गेला तर वीज ग्राहक मोबदल्यासाठी सुद्धा पात्र राहणार नाही, असे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने दिले आहे.

ठळक मुद्देयाचिकाकर्त्याच्या उद्देशावरही प्रश्नचिन्हविद्युत नियामक आयोगाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुनी थकबाकी भरल्यावरच विजेचे नवीन कनेक्शन दिले जाईल. थकबाकीमुळे वीजपुरवठा पूर्णपणे कापला गेला तर वीज ग्राहक मोबदल्यासाठी सुद्धा पात्र राहणार नाही, असे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने दिले आहे. हिंगणघाट येथील वीज ग्राहक गजेंद्रसिंह पवार आणि ग्राहक प्रतिनिधी बी. वी. बेताल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आयोगाने उपरोक्त आदेश दिले आहेत. आयोगाने याचिकाकर्र्त्याच्या उद्देशांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत याचिका खारीज केली.गजेंद्रसिंह पवार यंनी महावितरणच्या हिंगणघाट कार्यालयात नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता. तपासात ही बाब दिसून आली की, पवार यांनी जी जागा खरेदी करून वीज कनेक्शनसाठी अर्ज केला आहे. त्या जागेवरील वीज कनेक्शन कापण्यात आले आहेत. वीज बिल थकीत असल्याने ते कापण्यात आले. पवार थकीत बिल भरायला तयार होते. परंतु ग्राहक प्रतिनिधी बी.वी. बेताल यांनी त्यांना असे न करण्याचा सल्ला दिला.त्यांनी महावितरणच्या वर्धा येथील ग्राहक तक्रार केंद्र व नागपुरातील ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घेतली. परंतु दोघांनीही थकीत वीज बिल भरल्यावरच वीज कनेक्शन देण्याचे आदेश दिले. यावर ग्राहक प्रतिनिधीने विद्युत लोकपालकडे तक्रार केली. विद्युत लोकपालनेही वीज कनेक्शन कापण्यापूर्वी सहा महिन्यापर्यंतची थकबाकी घेण्याचा आणि ग्राहकाला पाच हजार रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले. महावितरणने यावर संशोधित बिल जारी करीत मोबदल्याचे पाच हजार रुपये देण्यासाठी पवार यांना त्यांचे बँक खात्याचा क्रमांक मागितला. परंतु त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. तसेच वीज नियामक आयोगापर्यंत हे प्रकरण नेले.याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्टच्या कलम १४२ व १४६ ची अवहेलना करण्यात आली आहे. त्यांनी ८० हजार रुपये नुकसान भरपाईचा दावाही केला होता. परंतु आयोगाने याचिका खारीज केली. आयोगाने म्हटले की, महावितरणने लोकपालच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोप तथ्यहीन आहे.याचिकाकर्त्याच्या उद्देशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयोगाने स्पष्टपणे सांगितले की, थकबाकीचे पूर्ण पैसे भरावे लागतील. केवळ मोबदल्याचे पाच हजार रुपये कमी होतील. मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि उपविधी अधिकारी संदीप केने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हेमंत पावडे व उपकार्यकारी अभियंता व्ही.बी. कोठारे यांनी महावितरणची बाजू मांडली.

टॅग्स :electricityवीज