शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर

By आनंद डेकाटे | Updated: October 16, 2025 14:53 IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले : रिपब्लिकन पक्षात येण्याची दिली ऑफर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवले. हिंसेचा मार्ग सोडून संविधानाचा मार्ग अवलंबिला. मुख्य प्रवाहात सहभागी झाले. त्या सर्व नक्षलवाद्यांचे आम्ही स्वागत करतो.ते मुख्य प्रवाहात आलेच आहेत. तर त्यांनी राजकारणातही यावे, निवडणूक लढवावी, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरूवारी व्यक्त केले. ते नागपुरात पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफरही देऊ केली. 

गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून हिंसेचा मार्ग सोडला. मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांना संविधानाची प्रत देऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करून घेतले. या घटनेसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, नक्षलवाद्यांचा त्यागाबाबत आम्हाला सहानुभूती आहे. अनेक उच्च शिक्षित लोकं यात आले. परंतु त्यांनी जो हिंसेचा मार्ग स्वीकारला तो मान्य नाही. नक्षलवाद्यांना आता हिंसेचा मार्ग योग्य नसल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे ज्या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले त्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि ज्यांनी अजुनही हिसेंचा मार्ग सोडलेला नाही त्यांनीही शस्त्र खाली ठेवून संविधानाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही केले. 

रिपाइंचे अनेक गट असले तरी देशभरात केवळ आमचाच रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे. दोन राज्यात आमचे आमदार आहेत. आणखी दोन राज्यात आमदार आले तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. पुढच्या वर्षी आमचा तसा प्रयत्न राहील. याच दृष्टीने पुढच्या वर्षी ८ मार्च रोजी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर रिपाइंचे राष्ट्रीय संमेलन भरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  पत्रपरिषदेला पूरणचंद्र मेश्राम, राजन वाघमारे, बाळू घरडे, विनोद थूल उपस्थित होते. 

बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

बिहारच्या निवडणुका  नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च जाहीर केले होते. त्यामुळे नितीश कुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. मतचोरीचा आरोप करणाऱ्या इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाले का? असा प्रश्नही उपस्थित केला. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांना थोडा फायदा होईल, पण मुंबईत सरशी महायुतीचीच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Athawale offers Naxalites who surrender to join politics, contest elections.

Web Summary : Ramdas Athawale welcomes Naxalites who embraced the constitution and offered them to join Republican party and contest elections. He clarified Nitish Kumar will be NDA's CM candidate in Bihar.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीRamdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGadchiroliगडचिरोली