शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग पर्यटन ही आराेग्यदायी जीवनाची किल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST

आशीष दुबे नागपूर : निसर्गात पर्यटन करणे ही आराेग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. चांगली झाेप आणि मनमाेकळे हास्य हेसुद्धा सुदृढ ...

आशीष दुबे

नागपूर : निसर्गात पर्यटन करणे ही आराेग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. चांगली झाेप आणि मनमाेकळे हास्य हेसुद्धा सुदृढ आराेग्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी भावना लाेकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली.

नावेदा वेलनेस ग्रुपचे संचालक लाल दर्यानानी यांचा १५ एप्रिल राेजी वाढदिवस आहे. यानिमित्त जानेवारीपासून सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमांतर्गत गुरुवारी ‘८० ही नवीन ५० आहे’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयाेजन करण्यात आले. जगातील ५० पेक्षा अधिक देशांमध्ये ते प्रसारित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित विजय दर्डा यांनी आयुष्य बदलणारे वेबिनार असल्याची भावना व्यक्त केली. नैसर्गिक उपचार, आयुर्वेद आणि याेग मनाला शुद्ध करतात. तुम्ही अंतर्मनातून शुद्ध असाल तर चेहऱ्यावर त्याचे तेज जाणवते. लाल दर्यानानी हे खरे भारतीय, जिंदादिल व्यक्ती आणि विश्वासू मित्र असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लाल दर्यानानी यांनी आभार मानले. वेबिनारमध्ये एकता इंटरनॅशनल कं. लि. तायवानचे सीईओ दिलीप अमरनानी, मलेशिया टाॅवर असाेसिएशनचे अध्यक्ष रवींद्र सिंह, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट व मॅराथनर हाँगकाँगचे दर्शन पारेख व चिल्ड्रेन्स टीव्ही कार्यक्रमाचे निवेदक एचकेजी हॅरी वाँग प्रामुख्याने उपस्थित हाेते.

नावेदा वेलनेसच्या सीईओ वीणा दनसिंघानी यांनी सांगितले, नावेदा हे हाॅँगकाँगमधील पहिले एकिकृत वेलनेस सेंटर आहे, ज्यामध्ये प्राचीन हिंदू वैदिक मंत्र, आधुनिक व विज्ञान आधारित प्राकृतिक उपचार पद्धतीसह संयाेजित करून भारतीय उत्पादन व सेवा देण्याचे व प्रसारित करण्याचे काम करीत आहे.

(सर्व १२ विशेष सत्र आणि सूचनात्मक वेबिनार नावेदाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत.)

लाल भाई यांचे वयच जाणवत नाही

वेबिनारचे प्रमुख पाहुणे राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत लाल दर्यानानी यांच्यासाेबत चीनमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. एका हाॅटेलमध्ये बिल देण्यावरून दाेघांचा वाद चालला हाेता. बिल देण्याच्या इच्छेने आपण माेठे आहाेत असा विचार करून, ज्याचे वय अधिक ताे बिल देइल, अशी अट घातली. मात्र लाल भाई यांचा पासपाेर्ट पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. लाल भाई आपल्यापेक्षा माेठे आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याकडे पाहून वय जाणवत नसल्याचे जैन यांनी सांगितले.

१९९१ मध्ये हाँगकाँग विद्यापीठात आयुर्वेदाबाबत घरगुती उपचार पद्धतीला औषध म्हणून वैज्ञानिक मान्यता मिळवून देण्यासाठी संशाेधन करण्यात आले.

-डॉ. संजय नगरकर, वैज्ञानिक, इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग ॲण्ड डेव्हलपमेंट

पूर्वेची संस्कृती अधिकाधिक प्रमाणात पश्चिमेकडे जात आहे. लाेकांनी आयुष्याकडे समग्र दृष्टीने पाहावे, असे लक्ष्य निर्धारित करावे.

-अलीशा अली, निदेशक, युनिक यू करिअर, ब्रुसेल्स

ब्रह्मांड, पृथ्वी, सूर्य, हवा, पाणी आणि अग्नी यांचा वयाशी संबंध जाेडता येत नाही. कमी जगलाे तरी चालेल पण अधिकाधिक निर्मिती करून जगाला द्या.

-जगदीश ब्रमता, संस्थापक, जीवा बॅलेंस इंडिया