शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मिरगी दिन: 'मिरगी लपवू नका, वेळेवर औषधोपचार घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 03:34 IST

चंद्रशेखर मेश्राम यांचा सल्ला, भारतात एक कोटी २० लाख लोक आजाराने पिडीत

नागपूर : ज्युलियस सिझर, चार्ल्स डिकन, नेपोलियन, वॅन गॉग, अल्फ्रेड नोबेल, अगाथा क्रिस्टी, लुई कॅरॉल, टोनी ग्रेग, क्रिकेटर जॉन्टी गेड्स जगातील या प्रसिद्ध लोकांना मिरगीचा (फिट येणे) आजार होता. त्यांनी या आजारावर यशस्वी मात केली. यामुळे मिरगीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. मिरगी किंवा अ‍ॅपिलेप्सी असल्यास किंवा त्याचा संशय असल्यास लपवू नका, योग्य डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्या. नियमीत आणि योग्य औषधोपचार घेतल्यास हा रोग बरा होतो, असा सल्ला प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट व ट्रॉपीकल न्यूरॉलाजीचे जागतिक अध्यक्ष डॉ. मेश्राम यांनी दिला.१७ नोव्हेंबर हा दिवस राष्टÑीय मिरगी दिन म्हणून पाळला जातो, त्या निमित्ताने डॉ. मेश्राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जगात पाच कोटींपेक्षा जास्त लोक मिरगीच्या आजाराने पिडीत आहेत. दरवर्षी यामध्ये २४ लाख रुग्णांची भर पडते. भारतामध्ये साधारण १ कोटी २० लाख लोक मिरगीने ग्रस्त आहेत. ८० टक्के लोक हे गरीब आणि मध्यम आर्थिक संपन्न असलेल्या देशांमध्ये आढळून येतात. या आजाराचे योग्य निदान होणे अतिशय आवश्यक आहे. कारण, मिरगी सारखी लक्षणे असणारे परंतु मिरगी नसणारेही काही आजार आहेत.परत-परत मिरगीचे अटॅक येण्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. रुग्ण औषध घेत नसेल, किंवा आपला आजार, त्रास कमी झाला असे समजून औषधे घेण्याचे टाळत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. घरी कार्यक्रम असल्यास किंवा सणवार असल्यास मिरगी असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीच्या दिवसांत हवा प्रदूषित होते, आवाजाचे प्रदूषण वाढते, आहारात बदल होत असल्यानेही अटॅक येण्याचे शक्यता किंवा प्रमाण वाढते. झोप कमी होण्यामुळे अटॅक येण्याचा धोका वाढतो.योग्य औषधोपचाराने ८० टक्के आजारा बरा होतोमागील काही वर्षांमध्ये बरेच नवीन संशोधन झाले. काही शोध सुरू आहेत. नवीन औषधे आलीत. या औषधांमध्ये ‘साईड इफेक्ट’ही कमी आहेत. ज्या रुग्णांमध्ये झटके थांबत नाही त्यांच्यातील एक व दोन टक्के रुग्णांमध्ये शस्त्रक्रियांचा पर्याय असतो. योग्य डॉक्टराचा सल्ला, योग्य आहार, नियमीत औषधोपचाराने ८० टक्के रुग्णांमध्ये मिरगीचा आजार बरा होऊ शकतो आणि ते सामान्य जीवन जगू शकतात, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.