शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कॅन्सर ग्रीड योजनेला राज्यात प्राधान्य

By admin | Updated: August 21, 2016 03:19 IST

राज्याच्या कानाकोपऱ्यात कर्करोगावरील उपचार पोहोचला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस : ‘नॅशनल काँग्रेस आॅन मॅनेजमेंट आॅफ थायरॉईड कॅन्सर’वर परिषदनागपूर : राज्याच्या कानाकोपऱ्यात कर्करोगावरील उपचार पोहोचला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर ग्रीड’ला महाराष्ट्रातही प्राधान्य दिले जाईल. यामुळे उपचारात सुसूत्रता व एकवाक्यता येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.‘नॅशनल काँग्रेस आॅन मॅनेजमेंट आॅफ थायरॉईड कॅन्सर’च्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. थायरॉईड सोसायटी नागपूर आणि विदर्भ व सोसायटी आॅफ हेड अँड नेक आॅन्कॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. मदन कापरे, सचिव डॉ. देवेन माहोरे, डॉ.प्रथमेश पै व डॉ. आर. रवी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण दिसून येतात. यातील बरेचसे रुग्ण शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी येतात, अशावेळी या रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांनाही कठीण जाते. म्हणूनच कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. ही परिषद यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास आहे. थायरॉईड कॅन्सर विशेषज्ञ डॉक्टरांनी मिळून स्थापन केलेल्या या संस्थेमुळे सामान्य माणसाला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे सोईचे होईल. कॅन्सर विरोधी लढा देण्यासाठी थायरॉईड सोसायटी मोठ्या प्रमाणात जागृती करेल, असेही ते म्हणाले. तंबाखूच्या दुष्परिणामांची जनजागृती शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे गेल्या अनेक वर्षांपासून करीत असल्याचे सांगून, त्यांच्या कार्याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केले. खा. अजय संचेती म्हणाले, राज्यातच नव्हे तर देशात मधुमेहासोबतच थायरॉयडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या धर्तीवर ‘इंडियन सोसायटी आॅफ थायरॉयड सर्जन्स’ या संस्थेची केलेली स्थापना रुग्णांच्या फायद्याची ठरणार आहे. गेल्या २१ वर्षांपासून डॉ. कापरे मेळघाटात आपली सेवा देत आहे. त्यांचे हे कार्य मोलाचे असल्याचेही ते म्हणाले. डॉ. मदन कापरे यांनी संस्थेचे उद्दिष्ट मांडले. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थायरॉईड सोसायटीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. डॉ. तुलसीदास भिलावेकर यांचा उत्कृष्ट सेवेसाठी सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक डॉ. माहोरे यांनी केले. आभार डॉ. आर. रवी यांनी मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, डॉ. पिनाक दंदे, डॉ. राजू खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)