रामाच्या नावानेच देशाला ऐक्यात बांधले : राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:37 IST2021-01-16T02:36:54+5:302021-01-16T02:37:29+5:30

विदर्भात राममंदिर निधी संकलनाला सुरुवात

The name of Rama united the country: Governor | रामाच्या नावानेच देशाला ऐक्यात बांधले : राज्यपाल

रामाच्या नावानेच देशाला ऐक्यात बांधले : राज्यपाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अद्यापही संकल्पपूर्ती झालेली नाही. देशात रामराज्य येईल तेव्हाच संकल्प पूर्ण होईल. आपल्यासाठी राम हेच राष्ट्र असून, रामाच्या नावाने देशाला ऐक्याच्या सूत्रात बांधले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

राज्यपाल आणि हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जुनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ प्रांत निधी समर्पण अभियानाची सुरुवात झाली. पोद्दारेश्वर राममंदिरात आयोजित कार्यक्रमादरम्यान राज्यपाल बोलत होते. राज्यपालांनी या निधीत १ लाख ११ हजारांचे योगदानदेखील दिले.

कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी आरतीदेखील केली व त्यानंतर मोकळ्या जागेत जमलेल्या भाविकांना संबोधित केले. विदर्भात १५ फेब्रुवारीपर्यंत निधी संकलन व गृहसंपर्क अभियान राबविण्यात येईल. निधी संकलन पावती पुस्तक व कूपनच्या माध्यमातून केल्या जाईल, अशी माहिती प्रांत अभियान प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली.
 

Web Title: The name of Rama united the country: Governor