शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

नागपुरात मेडिकलमध्ये अ‍ॅडमिशनची थाप, ४० लाखांनी लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 8:58 PM

मेडिकलमध्ये पाल्याची अ‍ॅडमिशन करून घेण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या नरखेडमधील दोन मित्रांना त्यांच्या मुलांची एमबीबीएसला अ‍ॅडमिशन करून देतो, असे सांगून एका टोळीने ३६ लाख रुपयांचा गंडा घातला तर, बीएएमएसची अ‍ॅडमिशन करून देतो म्हणून मानकापुरातील एका व्यक्तीचे अमरावती जिल्ह्यातील आरोपीने चार लाख रुपये हडपले. २४ तासात गिट्टीखदान तसेच मानकापुरात हे दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनरखेडमधील पालकांना ३६ लाख , मानकापुरातील व्यक्तीलाही चार लाखांचा गंडा२४ तासात दोन गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये पाल्याची अ‍ॅडमिशन करून घेण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या नरखेडमधील दोन मित्रांना त्यांच्या मुलांची एमबीबीएसला अ‍ॅडमिशन करून देतो, असे सांगून एका टोळीने ३६ लाख रुपयांचा गंडा घातला तर, बीएएमएसची अ‍ॅडमिशन करून देतो म्हणून मानकापुरातील एका व्यक्तीचे अमरावती जिल्ह्यातील आरोपीने चार लाख रुपये हडपले. २४ तासात गिट्टीखदान तसेच मानकापुरात हे दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.नरखेड येथील रहिवासी विनोद अंबादास लोखंडे (वय ५६) तसेच त्यांचे मित्र बेले यांना १३ ऑगस्ट २०१८ला आरोपी सुमित सुशिल तिवारी (वय २८, रा. जाफरनगर), निखील गिरीपुजे (वय २४, रा. भंडारा), मोहित, सुजित तिवारी आणि सिंग या पाच जणांनी गाठले. तुमच्या मुलांची एमबीबीएसला इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात अ‍ॅडमिशन करून देतो, अशी या टोळीतील आरोपींनी थाप मारली. त्यासंबंधाने २०१८ च्या पात्रता परीक्षा (नीट) साठी कागदपत्रे घेऊन महाविद्यालय परिसरात बोलविले. तेथे एमबीबीएस प्रवेशाबाबत माहिती देऊन लोखंडे यांच्या मुलाची तर बेले यांच्या मुलीची कागदपत्रे घेतली. त्यानंतर दोघांनाही महाविद्यालयाच्या नावाने बँकेतून डीडी बनवून घेतले. काही दिवसानंतर तेथे एमबीबीएसची अ‍ॅडमिशन झाल्याचे सांगून आरोपींनी त्यांना महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची एक बनावट यादी दाखवली. त्यानंतर लोखंडे आणि बेले यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ३६ लाख रुपये घेतले. पैशांचा व्यवहार गिट्टीखदानमधील फ्र्रेण्डस कॉलनीत असलेल्या जोशी फरसाण (हॉटेल) मध्ये झाला. दरम्यान, विनोद लोखंडे यांनी प्रवेश झाल्याबाबतची कागदपत्रे मागितली असता आरोपींनी त्यांना इंदिरा गांधी महाविद्यालय रुग्णालय नागपूरच्या नावाने बनावट पावत्या दिल्या. तसेच लोखंडे यांच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज पाठवून लोखंडे तसेच बेले यांच्या मुलामुलीची अ‍ॅडमिशन झाल्याचे भासविले. रक्कम दिल्यानंतर बरेच दिवस होऊनही अधिकृत प्रवेशपत्र न मिळाल्याने लोखंडे तसेच बेले यांनी महाविद्यालयात जाऊन चौकशी केली असता आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपींकडे लोखंडे आणि बेलेंनी आपली रक्कम परत मिळावी म्हणून संपर्क केला.अनेक दिवसांपासून आरोपी टाळाटाळ करीत असल्यामुळे ते रक्कम परत करणार नाही, हे लक्षात आल्याने लोखंडे आणि बेलेंनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, टोळीची चौकशी केली जात आहे.ओळखीच्यानेच केली दगाबाजीमानकापुरातील अंजना देवी मंगल कार्यालयाजवळ राहणारे अरुण पुंडलिक खोडे (वय ५३) आणि आरोपी सचिन ज्ञानेश्वर अरबट (वय ३६, रा. वाठोडा, वरुड, जि. अमरावती) यांची जुनी ओळख आहे. खोडे त्यांच्या मुलीला मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळावी म्हणून प्रयत्नरत होते. काही दिवसांपूर्वी खोडे यांनी याबाबत आरोपी सचिनकडे विचारणा केली. आरोपी सचिन याने आपली अमरावती येथील डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक महाविद्यालयात ओळख असून, तेथे आपण तुमच्या मुलीची बीएएमएस १५ लाख रुपयांत अ‍ॅडमिशन करून देऊ शकतो, असे सांगितले. आरोपी सचिन ओळखीचा असल्यामुळे खोडे यांनी त्याला पहिल्यांदा ४ लाख रुपये दिले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपी खोडे यांना टाळू लागला. अ‍ॅडमिशनसाठी विचारले असता तो असंबंद्ध उत्तरे देऊ लागला. त्याला ४ लाख परत मागितले असता तेदेखिल तो परत करत नव्हता. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने शुक्रवारी खोडे यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सचिनची चौकशी सुरू आहे.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयfraudधोकेबाजी