शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाकडून नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:43 IST

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुठलेही अडथळे येणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण वाढल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होती. न्यायालयापुढे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेचानिवडणूक कार्यक्रम घोषित केल्याची माहिती सादर केली तर राज्य सरकारने न्यायालयाला ओबीसीची लोकसंख्या सादर करण्यासंदर्भात मुदत मागितली आहे. पण आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुठलेही अडथळे येणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.जिल्हा परिषदेत आरक्षणाची टक्केवारी ५७ टक्क्यावर गेल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने सरकारला निर्देशसुद्धा दिले होते. परंतु राज्य सरकारकडून कुठलेही पाऊल उचलले न गेल्याने नंदूरबार व वाशीम येथून काही कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने सरकारला ओबीसीची लोकसंख्या सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय जिल्हा परिषदेला मुदतवाढ दिल्यावरून सरकारला फटकारले सुद्धा होते. त्यामुळे सरकारने तात्काळ कार्यवाही करीत जिल्हा परिषद बरखास्त केली व प्रशासकाची नियुक्ती केली.दरम्यान जिल्हा परिषद बरखास्त झाल्याने राज्य निवडणूक आयोग राज्य सरकारच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन सदस्यीय बेंचपुढे आयोगाने आपले मत मांडले. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला दोन महिन्याचा वेळ दिला. परंतु राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा तोडगा काढला नाही. त्यामुळे आयोगाला निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया राबवून कार्यक्रम घोषित केला. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासंदर्भात सुनावणी होती. पण आयोगाने एका दिवसापूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. आयोगाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली. त्यावर आयोगाने कुठलाही आक्षेप घेतला नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक