शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ होणार

By admin | Updated: August 21, 2016 03:24 IST

एअर इंडियाचा एमआरओ, लवकरच सुरू होणारा इंदमारचा एमआरओ, ‘ताल’ची बोर्इंग विमानांसाठी फ्लोअर बीमची निर्मिती

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास : ‘ताल’ मिहानसाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडरनागपूर : एअर इंडियाचा एमआरओ, लवकरच सुरू होणारा इंदमारचा एमआरओ, ‘ताल’ची बोर्इंग विमानांसाठी फ्लोअर बीमची निर्मिती या उपलब्धीसह नागपुरात विमान क्षेत्रासाठी जास्त क्षमता आहे. विमानासाठीच्या निर्माण उद्योगामध्ये नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ म्हणून लवकरच पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.मिहानमधील टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशनतर्फे ड्रीमलायनर ७८७-८ आणि १० बोर्इंग विमानांसाठी निर्माण केलेल्या पाच हजाराव्या फ्लोअर बीमच्या पुरवठ्यासंदर्भातील कन्साईनमेंटचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. तसेच विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती विभाग जेनेरिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष देशमुख, अनिल सोले, महापौर प्रवीण दटके, बोर्इंगच्या आशिया पॅसिफिक अ‍ॅन्ड इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) डॉ. दिनेश केसकर, डॉ. आर.ए. माशेलकर, बोर्इंग इंडिया लि.चे अध्यक्ष डॉ. प्रत्युशकुमार, ‘ताल’चे अध्यक्ष आर.एस. ठाकूर, कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री, मुख्य कार्यान्वयन अधिकारी लोकेश श्रीवास्तव, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी गुंटर बट्सचेक आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)