Nagpur Crime: नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी एकाच घरात दोन मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. २९ वर्षीय इंजिनिअर मुलगी आकांक्षा ब्रह्मे आणि तिची ५२ वर्षीय आई संगीता ढबाले यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. माय-लेकींनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
बाळाचा मृत्यू आणि सासरचा छळ
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षाचे दोन वर्षांपूर्वी एका इंजिनिअर तरुणाशी लग्न झाले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दोन महिन्यांपूर्वी आकांक्षाच्या गर्भातच तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. अशा कठीण काळात सासरच्या मंडळींनी तिला आधार देण्याऐवजी या मृत्यूला तिलाच जबाबदार धरून तिचा मानसिक छळ सुरू केला, असा आरोप नातेवाईकांनी केला. याच त्रासाला कंटाळून आकांक्षा आपल्या आईकडे राहायला आली होती.
सुसाईड नोटमधील 'ती' शेवटची इच्छा
पोलिसांना घटनास्थळी दोन सुसाईड नोट सापडल्या आहेत. आई संगीता यांनी आपण स्वेच्छेने हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. मात्र, आकांक्षाने लिहिलेल्या शेवटच्या इच्छेने सर्वांनाच धक्का बसला आहे. "माझा मृतदेह सासरच्या ताब्यात देऊ नका आणि माझे अंत्यसंस्कार माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या जागीच करा," असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.
घटनेच्या रात्री नेमकं काय घडलं?
गुरुवारी रात्री आकांक्षाचा पती लोकेश हा सासरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याचे म्हटलं जात आहे. तो गेल्यानंतर नैराश्यात असलेल्या माय-लेकीने रात्रीच्या सुमारास लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. शुक्रवारी सकाळी आकांक्षा फोन उचलत नसल्याने लोकेश पुन्हा घरी आला, तेव्हा खिडकीतून त्याला या दोघींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले.
नातेवाईकांनी मालमत्तेचा वाद आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप सासरच्या मंडळींवर केले आहेत. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सुसाईड नोट आणि नातेवाईकांचे जबाब लक्षात घेता, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
Web Summary : Nagpur: A mother and her engineer daughter committed suicide, allegedly due to harassment from the daughter's in-laws following the death of her unborn child. Suicide notes revealed the daughter's wish to be cremated with her father and not be handed over to her husband's family. Police are investigating.
Web Summary : नागपुर: एक माँ और उसकी इंजीनियर बेटी ने कथित तौर पर दहेज उत्पीड़न से तंग आकर आत्महत्या कर ली। बेटी के गर्भ में पल रहे बच्चे की मौत के बाद ससुराल वाले उसे प्रताड़ित कर रहे थे। सुसाइड नोट में बेटी ने पिता के साथ अंतिम संस्कार करने की इच्छा जताई। पुलिस जांच कर रही है।