शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशात गांजा घेऊन सापडला नागपुरातील पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गांजाची खेप सोबत बाळगताना नागपूर शहर पोलीस दलातील एका हवालदाराला ओडिशा (पश्चिम) मधील पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गांजाची खेप सोबत बाळगताना नागपूर शहर पोलीस दलातील एका हवालदाराला ओडिशा (पश्चिम) मधील पोलिसांनी जेरबंद केले. रोशन उगले असे त्याचे नाव असून तो वाठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या कारवाईचे वृत्त शुक्रवारी रात्री शहर पोलीस दलाला कळताच एकच खळबळ उडाली आहे.

हवालदार उगले गेल्या वर्षभरापासून वाठोडा पोलीस ठाण्यात नियुक्तीला आहे. मात्र, महिनाभरापासून तो आजारी रजेच्या नावाखाली कर्तव्यावर आलाच नाही. शुक्रवारी दुपारी ओडिशातील बरगड, सोनपूरजवळच्या बारापाली रेल्वेगेटजवळ पोलिसांनी एक इनोव्हा कार अडवली. कारची झडती घेतली असता त्यात २१ किलो गांजा आढळला. इनोव्हात हवालदार उगले अन् त्याची पत्नी तसेच अन्य दोन साथीदार होते. पोलिसांनी त्यांची चाैकशी केली. समाधानकारक माहिती मिळत नसल्यामुळे ओडिशा पोलिसांनी शहर पोलीस दलातील वरिष्ठांना ही माहिती कळविली. त्यानंतर रात्री वाठोडा पोलिसांना ते कळले. त्यामुळे पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. या संबंधाने हवालदार उगले ज्या इनोव्हात पत्नी आणि दोन साथीदारांसह आढळले, त्यात २१ किलो गांजा आढळला, अशी माहिती आम्हाला मिळाल्याचे वाठोड्याच्या ठाणेदार आशालता खापरे यांनी लोकमतला सांगितले. त्यासंबंधाने तिकडे चाैकशी सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

-----

उगले तस्कर कसा बनला?

आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामधून नागपुरात मोठ्या प्रमाणात नियमित गांजाची खेप आणली जाते. पोलिसांकडून वेळोवेळी अनेक गांजा तस्कर तसेच गांजाची खेप आणणाऱ्यांना अटकही केली जाते. हवालदार उगले पोलीसगिरी सोडून गांजाच्या तस्करीत कसा शिरला, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.