शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागपूर ‘कर्फ्यू’मुक्त, सहा दिवसांनी बाजारपेठा सुरू, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

By योगेश पांडे | Updated: March 23, 2025 18:05 IST

Nagpur News: १७ मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांचेदेखील नुकसान होऊ नये अशी मागणी समोर येत होती.

- योगेश पांडे नागपूर -  १७ मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांचेदेखील नुकसान होऊ नये अशी मागणी समोर येत होती. पोलिसांनी एकूण स्थितीचा आढावा घेत तहसील, कोतवाली, गणेशपेठ व यशोधरानगरमधील कर्फ्यू मागे घेतला आहे. शहर ‘कर्फ्यू’मुक्त झाले असले तरी अनेक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था मात्र तैनात राहणार आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. यात सक्करदरा, तहसील, कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर, नंदनवन, इमामवाडा, शांतीनगर, लकडगंज, पाचपावली, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र, गुरुवारी सकाळी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला, तर सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली होती. मात्र रात्री सक्करदरा, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, सक्करदरा व यशोधरानगर येथील शिथिलता रद्द केली. शांतता प्रस्थापित झाल्याने संवेदनशील जागा वगळता इतर ठिकाणचा कर्फ्यू उठवावा अशी मागणी समोर आली होती.

शनिवारी पोलिसांनी सक्करदरा, इमामवाडा, पाचपावली, शांतीनगर आणि लकडगंजमधील नागरिकांना दिलासा देत तेथील कर्फ्यू हटविला होता. रविवारी परत एकदा पूर्ण स्थितीचा आढावा घेण्यात आला व पोलीस आयुक्तांनी कोतवाली, तहसील, गणेशपेठ व यशोधरानगरमधील कर्फ्यूदेखील हटविण्याचे निर्देश दिले. दुपारी तीन वाजतापासून कर्फ्यू दूर झाला.

अनेक दुकाने, बाजारपेठा सुरूकर्फ्यूमुळे या परिसरांमधील बाजारपेठा बंद होत्या व त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कर्फ्यू दूर होताच अनेक दुकानदारांनी लगेच दुकाने उघडली. तर काही बाजारपेठादेखील लहानमोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दिसून आले.

सुरक्षायंत्रणांसमोर मोठे आव्हानदरम्यान, संवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा कायम राहणार आहे. इतर ठिकाणी पोलीस गस्तीवर राहणार आहेत. प्रस्थापित झालेली शांतता कायम राखून शहरात सद्भाव वाढविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस