शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

नागपुरात ४,३०० थकबाकीदारांची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:06 PM

शहरातील विजेचे थकीत बिल वाढून १०८.४४ कोटी रुपयांवर पोहोचल्याने चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुलीची गती वाढवली आहे. या वर्षातील दोन महिन्यात ४,३०० थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे.

ठळक मुद्देअभियानासाठी महावितरणचे विशेष पथक तैनातकार्यालयातील कर्मचारी जाताहेत घरोघरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विजेचे थकीत बिल वाढून १०८.४४ कोटी रुपयांवर पोहोचल्याने चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुलीची गती वाढवली आहे. या वर्षातील दोन महिन्यात ४,३०० थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. महावितरणचे पथक घरोघरी जाऊन वीज बिल भरण्याची विनंती करीत आहेत.महावितरणच्या आकडेवारीनुसार, शहरातील वीज बिलाची थकबाकी १०८.४४ कोटी रुपये झाली आहे. सर्वाधिक थकबाकी सिव्हिल लाईन्स डिव्हिीजनची आहे. येथे ३८.१७ कोटी रुपये थकबाकी आहे. यानंतर महाल डिव्हिजनमध्ये ३१.०५ कोटी रुपये आणि गांधीबाग डिव्हिजनमध्ये २४.५९ कोटी रुपयांचे वीज बिल ग्राहकांनी भरलेले नाही. हे तिन्ही डिव्हिजन वितरण फ्रेंचाईजी एसएनडीएलच्याअंतर्गत होते. दुसरीकडे महावितरणकडे असलेल्या काँग्रेसनगर डिव्हिजनमध्ये १०.३७ कोटी रुपये आणि एमआयडीसी डिव्हिजनमध्ये ४.२५ कोटी रुपयांचे वीज बिल ग्राहकांनी भरलेले नाही.आता महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ४,३०० वीज कनेक्शन कापण्यात आले आहेत. यापैकी २,९०० वीज कनेक्शन सिव्हिल लाईन्स, गांधीबाग आणि महाल डिव्हिजनमधील आहेत. उर्वरित १४०० कनेक्शन काँग्रेसनगर व बुटीबोरी-हिंगणा डिव्हिजनमधील आहेत. महावितरणने फ्रेंचाईजीकडे असलेल्या तिन्ही डिव्हिजनमध्ये प्रत्येकी १५ कर्मचाऱ्यांचे एक थकीत वसुली पथक तैनात केले आहे. उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सेवाही घेतली जात आहे. बिल न भरणाºया ग्राहकांचे कनेक्शन कापले जात आहे. वीज कनेक्शन कापल्याच्या एक महिन्यापर्यंत थकीत बिल भरले गेले नाही तर कनेक्शन नेहमीसाठी कट करण्याचीही तरतूद आहे.महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले की, थकबाकी वसुलीची मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. कारवाईपासून वाचण्यासाठी तातडीने थकीत बिल ग्राहकांनी भरावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे महावितरणने त्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करणे सुरू केले आहे, ज्या ठिकाणी थकबाकी अधिक आहे. या परिसरांमध्ये लष्करीबाग, बिनाकी, मोमिनपुरा, हसनबागसह अनेक झोपडपट्ट्यांचा समावेश आहे.वसुलीदरम्यान १५ ठिकाणी विरोधएसएनडीएलच्या परिसरात वीज पुरवठ्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर थकीत वसुलीसाठी गेलेल्या पथकाला १५ ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागला. मारहाणीच्या पाच घटना घडल्या. यात पोलीस तक्रारही करण्यात आली. अनेक ठिकाणी पथकाला शिवीगाळही झाली. एसएनडीएलचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी पोलीस आयुक्तांशी भेट घेऊन त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. आता पोलीस व महावितरण समन्वयातून वसुलीची कारवाई करीत आहे.नगरसेवक-नेते निशाण्यावरमहावितरणच्या सूत्रानुसार, वसुली मोहिमेंतर्गत अनेक नगरसेवक व काही नेत्यांच्या घरीही वसुली पथक धडकले आहे. शहरातील काही नगरसेवकांकडे वीज बिल थकीत आहे. सध्या महावितरणचे पथक पोहोचताच त्यांनी बिल भरले आहे.रि-कनेक्शन शुल्कावर जीएसटीबिल न भरल्यामुळे कापलेले वीज कनेक्शन जोडले जात आहे. परंतु यासाठी ग्राहकांना शुल्कासह जीएसटीही भरावी लागत आहे. सिंगल फेज कनेक्शनसाठी १०० रुपये तर थ्री फेजसाठी २०० रुपये शुल्क भरणे निश्चित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन