शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-बेळगाव विमानाचे उड्डाण १६ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST

- आठवड्यातून तीन दिवस असेल ५० आसनी ‘उडान’ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातून प्रथमच १६ मार्चपासून बेळगाव ...

- आठवड्यातून तीन दिवस असेल ५० आसनी ‘उडान’

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातून प्रथमच १६ मार्चपासून बेळगाव (कर्नाटक)साठी ‘उडान’ फ्लाइट सुरू होत आहे. या विमानाचे उड्डाण आठवड्यातून तीन दिवस अर्थात मंगळवार, गुरुवार व रविवारी होईल. ही फ्लाइट दुपारी ४.४५ वाजता नागपुरात उतरेल आणि संध्याकाळी ५.१० वाजता बेळगावसाठी उड्डाण भरेल.

‘उडान’ योजनेच्या तिसऱ्या चरणात लागलेल्या बोलीमध्ये स्टार एअरने नागपूर-बेळगाव सेक्टर मिळवले आहे. यानंतर सोमवारी एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एअरलाइन्स या सेक्टरवर ईआरजे १४५ विमानाचे संचालन करेल. या विमानाची आसनक्षमता ५० सिटर आहे. एकावेळी जास्तीत जास्त २,८७३ किमीचे अंतर कापण्याची क्षमता या विमानाची आहे. मात्र, या मार्गावर विमानाला नागपूर विमानतळापासून ते वीर राणी कित्तूर चेन्नमा एअरपोर्ट, बेळगावीपर्यंत जवळपास ९०० किमीचेच अंतर कापायचे आहे. मात्र, या सेक्टरला धरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बेळगावपासून केवळ गोवाची जवळीक वाढू शकते. ‘उडान’ फ्लाइटने बेळगावला पोहोचल्यावर रस्ता मार्गाने जवळपास तीन तासात गोवा येथे पोहोचणे शक्य होईल. त्यातच नागपुरातून संचालित होणारी ही पहिली रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम (आरसीएस) फ्लाइट ठरेल. नागपूर विमानतळावर लवकरच संबंधित एअरलाइन्ससाठी काउंटरसह अन्य व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहेत.

..............