शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी नागपूर ठरत आहे पहिली पसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:15 IST

आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई-पुणे येथील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आता नागपूर पहिली पसंती ठरत आहे.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांचा मुंबई-पुणेकडे कानाडोळाप्रॉपर्टीचे अनेक पर्याय, दर कमीच

आनंद शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावपळीच्या जीवनात आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई-पुणे येथील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आता नागपूर पहिली पसंती ठरत आहे. मुंबई-पुणे येथे गुंतवणूकदारांची निराशा होण्याचे एकीकडे अनेक कारणे आहेत तर दुसरीकडे नागपुरात गुंतवणुकीची अनेक कारणे सांगितली जात आहेत.पुढील दिवसात नागपूर एक प्रॉपर्टी मार्केट म्हणून वेगाने पुढे येईल, असे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यांच्यानुसार मुंबई-पुणे येथे प्रॉपर्टीचे दर सर्वाधिक आहेत तर ट्रॉफिक कंजेशनसह अन्य समस्यांच्या कारणांनी आता गुंतवणूकदारांचा नागपूरकडे कल वाढण्याचे संकेत मिळत आहेत. सद्यस्थितीत मुंबई-पुणे येथे कोविड-१९ संक्रमण वेगाने पसरत असल्याने नागपुरात रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळण्याची अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.नागपुरात दर्जेदार बांधकामाच्या प्रॉपर्टीच्या अनेक किफायत रेंज उपलब्ध असल्याचे जाणकारांचे मत आहे. येथे हिरवळ जास्त आणि प्रदूषणाचा स्तर कमी आहे. 

लॉकडाऊनमध्ये प्रॉपर्टीची विचारपूस वाढलीलॉकडाऊनमध्ये मुंबई-पुणे येथील लोकांकडून नागपुरात प्रॉपर्टीची विचारपूस वाढली आहे. वर्क फ्रॉम होमच्या कल्चरने नागपुरात प्रॉपर्टी मार्केटला पुढील दिवसात बूस्ट मिळेल. येथे ट्रॅफिक आणि प्रदूषणाची समस्या नाहीच. प्रॉपर्टीचे दर तुलनात्मकरीत्या कमी आहेत. त्याचा फायदा मुंबई-पुणे येथे कार्यरत नागपुरातील लोकांना होत आहे.- महेश साधवानी,अध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो.

आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वोत्तम पर्यायसध्याच्या टप्प्यात मुंबई-पुणेच्या तुलनेत नागपूर आरोग्य आणि प्रॉपर्टीत गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. येथे मेट्रो रेल्वे, काँक्रिट रोड यासारख्या सुविधा आहेत. वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे गुंतवणूक वाढेल. मिहानमध्ये कंपन्यांना आकर्षित केल्याने येथे रोजगार वाढेल.- राजेंद्र (निर्मल कुमार) आठवले, माजी अध्यक्ष,बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र).सवलतींमुळे बूस्टकोविड-१९ नंतर नागपूरचे रिअल इस्टेट क्षेत्र वेगाने पुढे वाढणार आहे. मुंबई-पुणे येथे कार्यरत नागपुरातील अधिकाधिक लोकांनी नागपुरात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करावी, याकरिता सरकारतर्फे स्टॅम्प ड्युटी आणि रेडिरेकनरच्या दरात कपात करावी. यामुळे महसूल वाढीसह रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळेल.- अभिजित मजुमदार, एमडी, अभिजित रियलेटर्सअ‍ॅण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि.

किफायत दरात मिळणार प्रॉपर्र्टीसुरक्षा, प्रदूषण, ट्रॅफिक कंजेशनच्या दृष्टीने नागपूरची स्थिती सर्वोत्तम आहे. दर मुंबई, पुणेच्या तुलनेत किफायत आहेत. मुंबई आणि पुणे येथील लोक वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे नागपुरात प्रॉपर्टी घेऊन येथून काम करीत आहेत. सर्वोत्तम एअर, रेल्वे, रोड कनेक्टिव्हिटीमुळे ते एक-दोन आठवड्यात मुंबई, पुणे येथील कार्यालयात जाऊ शकतात.- अभय जोशी, संचालक,लक्ष्मी केशव कन्स्ट्रक्शन्स.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग