शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर  नमो बुद्धाय, जयभीमचा जयघोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 21:49 IST

नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती.

ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तथागतांचे धम्मचक्र गतिमान केले. या ऐतिहासिक क्रांतीला भारताच्या इतिहासात वेगळेच महत्त्व आहे. या दिनाच्या निमित्ताने सोमवारी केवळ नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती.‘६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना’च्यानिमित्ताने सकाळी ७ वाजता दीक्षाभूमीवर विविध संघटनांच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. शुभ्र वस्त्र परिधान केलल्या जत्थ्याजत्थ्याने येणाऱ्या अनुयायांनी दीक्षाभूमी फुलून गेली होती. दीक्षाभूमी येथील स्तुपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देत जयघोष केला जात होता. सायंकाळी अनुयायांची गर्दी वाढली होती. अनेक जण आपल्या कुटुंबासह जेवण्याच्या डब्यासह आले होते. ‘जयभीम’ या एकाच उच्चाराने अनोळखी कुटुंबही आपला डबा ‘शेअर’ करताना दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी होती. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्यावतीने पिण्याचे पाणी व इतरही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. फूटपथावर पुस्तकांचे व तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेबांच्या मूर्ती, फोटोंचे स्टॉल्स लागले होते. विशेष म्हणजे, यावर्षी केवळ नागपुरातूनच नव्हे तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कोल्हापूर आदी ठिकाणांहूनही अनुयायी आले होते.वस्त्यावस्त्यांमधून निघाली रॅलीनागपूरच्या विविध वस्त्यांमध्ये ‘भीम रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी निघालेली रॅली सायंकाळी दीक्षाभूमीवर पोहचताच एकच जल्लोष होत होता. पांढऱ्या वस्त्रातील अनुयायी ‘जयभीम’च्या जयघोषात एकमेकांना शुभेच्छा देत होते. जयभीमनगर, इंदोरा, टाकळी सीम, नारा, बेझनबाग, अंबाझरी, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंदननगर, जाटतरोडी, चंद्रमणीनगर, नवीन बाभूळखेडा, मानेवाडा, दिघोरी यासारख्या कितीतरी वस्त्यांमधून रॅली निघाल्या.संविधान चौकात आकर्षक रोषणाईसंविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. येथेही सकाळपासून अनुयायांनी गर्दी करून बाबासाहेबांना मानवंदना दिली. सायंकाळी या ठिकाणी काही संघटनांनी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीReligious programmeधार्मिक कार्यक्रम