शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शंभर कोटींचे कर्ज घेणार

By admin | Updated: November 10, 2015 03:34 IST

एलबीटी रद्द करण्यात आल्याने महापालिका आर्थिक संकटात आहे. विकास प्रकल्पासाठी निधी उभारताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

स्थायी समितीची मंजुरी : सभागृहाच्या मंजुरीनंतर शासनाला प्रस्ताव पाठविणारनागपूर : एलबीटी रद्द करण्यात आल्याने महापालिका आर्थिक संकटात आहे. विकास प्रकल्पासाठी निधी उभारताना प्रशासनाची दमछाक होत आहे. महापालिकेच्या डोक्यावर २७५ कोटीचे कर्ज शिल्लक असताना पुन्हा पेंच टप्पा -४ प्रकल्पासाठी १०० कोटीचे कर्ज घेणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सभागृहाच्या मान्यतेनंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सोमवारी दिली. महापालिकेने मार्च २०१० मध्ये २०० कोटी तर मार्च २०१४ मध्ये २०० कोटी अस ४०० कोटीचे कर्ज घेतले आहे. पैकी १२५ कोटीची परतफेड केली असून २७५ कोटीचे कर्ज शिल्लक आहे. परंतु महापालिकेला वार्षिक उत्पन्नाइतके कर्ज घेता येते. त्यामुळे ११०० कोटीपर्यंत कर्ज घेता येते. १०० कोटीच्या कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळताच कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पेंच टप्पा-४ हा खासगी सहभागातून राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी ५० कोटी, हुडकेश्वर-नरसाळा येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटी, पेंच टप्प्पा -४च्या कामाचे २७ कोटीचे दायित्व, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पाचे दायित्व म्हणून देणे असलेले ११ कोटी आदींचा यात समावेश आहे. सध्या प्रकल्पावर कंत्राटदाराने केलेल्या खर्चावर त्याला १३.२५ टक्के दराने व्याज स्वरूपात परतावा द्यावा लागत आहे. कमी व्याजदराने घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून एकमुस्त परतफेड करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.हा प्रकल्प ४८.९४ कोटीचा होता. परंतु प्रकल्पाला विलंब झाल्याने खर्च ६१ कोटी ९६ लाखावर गेला आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत व खर्च विचारात घेता या प्रकल्पासाठी कर्ज उभारण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थायी समितीकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. (प्रतिनिधी)