शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांचा ‘गतिमान’ दिवस

By admin | Updated: January 8, 2015 01:23 IST

पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा पहिला दिवस कार्यक्रम व भेटीगाठीत गेला. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी ते कामाला लागले. सकाळपासून विभागवार आढावा घेऊ न त्यांनी

पहिला दिवस : विभागाचा आढावा, गतिमान प्रशासनासाठी दिले वेळापत्रकनागपूर : पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा पहिला दिवस कार्यक्रम व भेटीगाठीत गेला. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी ते कामाला लागले. सकाळपासून विभागवार आढावा घेऊ न त्यांनी माहिती जाणून घेतली. शहर विकास आराखड्यावर चर्चा केली; सोबतच मनपाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला. सायंकाळपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. नागरी सुविधा व गतिमान प्रशासनात विभागप्रमुखांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी विभागप्रमुखांना कामाचा प्राधान्यक्रम ठरवून वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले. कोणतेही काम सुलभतेने व कर्तव्यभावनेतून करा, प्रलंबित काम तातडीने मार्गी लावा, कामाची गती वाढवा. शहरातील विकास कामासोबतच सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लावा, अशा स्वरूपाच्या सूचना केल्या. महापालिकेचा कारभार मुख्यालयातून चालतो. पण झोन कार्यालयांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. ही बाब विचारात घेता ते शहरातील सर्व झोन कार्यालयांना भेटी देऊ न आढावा घेणार आहेत. आयुक्त कामाला लागल्याने मनपातील अधिकाऱ्यांची लगबग वाढली आहे. निर्धारित वेळापत्रकातून रखडलेल्या कामांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही काम करावे लागेल. यासाठी त्यांनी विभागप्रमुखांच्या परिचयासोबतच सर्व विभागाचा बैठकीत आढावा घेतला. पदभार स्वीकारताच नागपूर शहराला विकासाचे मॉडेल बनविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना तसे नियोजन करावे लागणार आहे. याची प्रचिती दुसऱ्या दिवशीच्या बैठकीतून आली. यावेळी उपायुक्त आर.झेड.सिद्दीकी, संजय काकडे, प्रमोद भुसारी, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, निगम सचिव हरीश दुबे, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक सतीश रेंगे, उपसंचालक अ.अ.कुंभोजकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, शहर अभियंता संजय गायकवाड, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक, दिलीप जामगडे, कार्यकारी अभियंता अजीज उर रहमान, विकास अभियंता राहुल वारके, कार्यकारी अभियंता महेश गुप्ता, एम.एच. तालेवार, एस.बी. जैस्वाल, श्याम चव्हाण यांच्यासह विभागप्रमुख, दहा झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)