मुंढेंचे ‘मॅजिक’ जोशींसाठी ठरले ‘ट्रॅजिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 07:00 AM2020-12-05T07:00:00+5:302020-12-05T07:00:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या संदीप जोशी यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का ...

Mundhe's 'magic' turned out to be 'tragic' for Joshi | मुंढेंचे ‘मॅजिक’ जोशींसाठी ठरले ‘ट्रॅजिक’

मुंढेंचे ‘मॅजिक’ जोशींसाठी ठरले ‘ट्रॅजिक’

Next
ठळक मुद्देसमर्थकांनी राबविली होती मोहीमकोरोना काळातील विरोध जोशी यांना भोवला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या संदीप जोशी यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. महापौर जोशी यांनी ‘कोरोना’ काळात मुंढे यांना विरोध केला व त्यानंतर मुंढे समर्थकांनी ‘सोशल मीडिया’वर त्यांच्याविरोधात मोहीमच सुरू केली होती. बदली झाल्यानंंतर मुंढे नागपुरातून गेले, मात्र त्यांच्या कामगिरीचे गारुड लोकांच्या मनावर कायम राहिले. निवडणुकीच्या काळात तर जोशींविरोधातील मोहीम आणखी तीव्र झाली अन् त्यांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम झाला. मतपेटीमध्ये हीच नकारात्मकता मतांच्या माध्यमातून उतरली. पराभवाच्या इतर कारणांसोबतच मुंढे यांचा हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरला.

मनपा आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून मनपाची आर्थिक घडी नीट करण्यासाठी त्यांनी अवास्तव खर्च असलेल्या प्रकल्पांवर ‘ब्रेक’ लावला. यानंतर भाजप व महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांच्याविरोधी भूमिका घेणे सुरू केले. त्यातच ‘कोरोना’ची सुरुवात झाली आणि मुंढे यांनी रस्त्यांवर उतरत मोर्चा सांभाळला. मुंढे यांनी कोरोनाविरोधात उपाययोजना राबवत असताना राजकीय हस्तक्षेपाला थाराच दिला नाही. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे समाजाच्या सर्वच स्तरांतून त्यांची प्रशंसा झाली. नेमका त्याच वेळी जोशी यांनी मुंढे यांचा विरोध सुरू केला. भाजपच्या मनपातील नेत्यांनी मुंढे यांच्यावर खालच्या स्तरावर जात टीका केली. ही बाब मुंढे यांच्या समर्थकांसह सामान्य जनतेलादेखील खटकली होती व तेथूनच जोशी यांच्या प्रतिमेला फटका बसण्यास सुरुवात झाली.

मुंढे यांच्या समर्थकांनी जोशी यांच्याविरोधात ‘सोशल मीडिया’वर मोहीम सुरू केली. त्याला हजारो हिट्स मिळायला लागले. मुंढे यांची अचानक बदली झाली आणि समर्थकांकडून खापर जोशी यांच्या डोक्यावर फोडण्यात आले. मुंढेंविरोधात भाजपचे सर्व नगरसेवक, चार आमदार, दोन खासदार सातत्याने विरोधी भूमिका घेतात, त्यांना काम करु देत नाहीत असे चित्र उभे झाले. मुंढेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने जोशी लोकांच्या टीकेचे धनी बनले.

संघ स्वयंसेवकांचादेखील मुंढेंना पाठिंबा

त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू झाली. मुंढेंची बदली रद्द करावी या मागणीसाठी सव्वा लाख लोकांनी ऑनलाईन पिटिशनवर सह्या केल्या व ‘व्ही सपोर्ट तुकाराम मुंढे’ या नावाने आंदोलन उभे झाले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यात संघाच्या अनेक स्वयंसेवकांचादेखील सहभाग होता. ही मोहीम काहीशी थंड पडली असतानाच पदवीधरच्या निवडणुका घोषित झाल्या आणि परत एकदा मुंढे समर्थक सरसावले. ‘सोशल मीडिया’च्या शक्य तेवढ्या ‘प्लॅटफॉर्म’वर जोशी यांच्या उमेदवारीचा विरोध सुरू झाला. याचा कुठे ना कुठे फटका जोशी यांना पडला व मतपत्रिकेत त्याचे प्रतिबिंब उमटले.

Web Title: Mundhe's 'magic' turned out to be 'tragic' for Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.