शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

मुंढे इम्पॅक्ट :  रस्ते झाले मोकळे ; प्रशासनाला लागली शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 12:07 AM

तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकामचुकार अधिकारी व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. लेखा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिमेंट रोड कंत्राटदारांना आणि मनपाच्या अभियंत्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर फूटपाथ व रस्त्यांवरील फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली. ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.महापालिकेची शहरात १२६ उद्याने आहेत. यातील १३ उद्यानांची देखभाल व दुरुस्ती महापालिकेकडे आहे. तर ११३ उद्यानांची जबाबदारी खासगी कंत्राटदारांकडे आहे. परंतु अनेक उद्यानांची अवस्था बिकट आहे. उद्यानांची स्वच्छता व देखभाल व्यवस्थित होत नसल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.जनता दरबारामुळे नागरिकांना दिलासाअतिक्रमण, रस्ते, पाणीपुरवठा, सिवरेज, मोकाट कुत्रे, घरटॅक्स अशा स्वरुपाच्या नागरिकांच्या तक्रारी तातडीने मार्गी लागाव्यात. यासाठी तुकाराम मुंढे यांच्या नियमित जनता दरबाराला सुरुवात केली. यात दररोज ९० ते १०० तक्रारी वा समस्या येत आहेत. तक्रारींची तात्काळ सुनावणी केली जात आहे. तक्रारीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत तातडीने दखल घेण्यास सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.बाजारातील अतिक्रमण हटविलेशहरात विविध भागात दररोज किंवा आठवडी बाजार भरतात. मात्र मनपाने निर्धारित केलेल्या परिसराव्यतिरिक्त रस्त्यावर भाजी विक्रेते व्यवसाय करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय नागरिकांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. याची गांभीर्याने दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. आयुक्तांनी पदभार स्वीकारताचा फेब्रुवारीपासून कारवाईला धडाक्यात सुरुवात झाली. शहारातील ६२ बाजारावर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटविल्याने रस्ते मोकळे झाले. वाहतुकीचा अडथळा दूर झाला. रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरू आहे.

कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दणकापदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी पहिल्याच दिवशी नागपूर मनपाच्या लेखा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर दुसºया दिवशी सिमेंट रोड कंत्राटदारांना आणि मनपाच्या अभियंत्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली. एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी हा सिमेंट रस्ता जे.पी. इंटरप्रायजेस या कंपनीने तयार केला आहे. या रस्त्यांवरील आय ब्लॉक मानकाप्रमाणे नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. क्युरिंग पिरियड पूर्ण होण्यापूर्वीच आय ब्लॉक लावण्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. निकृष्ट कामाबाबत आयुक्तांनी यांनी जे.पी. इंटरप्राईजेस क्वॉलिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनिअर्स यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. गोकुळपेठ, बुधवाराला शिस्तगोकुळपेठ व कॉटन मार्के ट येथील बाजार जुने आहेत. परंतु भाजी विक्रेते रस्त्यावर येऊन दुकाने लावतात. यामुळे रहदारीला अडथळा होत होता. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी होत्या. याची दखल घेत गोकुळपेठ व कॉटन मार्केटसह शहरातील आठवडी बाजारात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून शिस्त लावली. तसेच स्वच्छता राहावी यासाठी विक्रे त्यांना कचरापेटी ठेवणे बंधनकारक केले.कर वसुलीसासाठी कठोर भूमिकानागपूर शहरात ६ लाख १३ हजार मालमत्ता आहेत. यातील ३ लाख ३३ हजार ८७ मालमत्ताधारकांकडे ४५४ कोटींची थकबाकी आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असल्याने तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे