शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: June 4, 2017 01:51 IST

किसान क्रांतीने पुकारलेला शेतकऱ्यांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला ...

जय जवान जय किसानही उतरले आंदोलनात : रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : किसान क्रांतीने पुकारलेला शेतकऱ्यांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी नागपुरात मात्र शेतकऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच होता. या आंदोलनात आता जय जवान जय किसान संघटनेने उडी घेत कॉटन मार्केट चौकात आंदोलन केले. नागपुरात हे आंदोलन संपण्याऐवजी यात आणखी नवीन संघटना सहभागी झाल्या असून तिसऱ्या दिवशी जय जवान जय किसान या संघटनेचे प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात पवार अमृत महोत्सव समिती आणि युवा स्वाभिमान पार्टीतर्फे कॉटन मार्केट चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी तब्बल तीन हजार लिटर दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात प्रशांत पवर यांच्यासह दुनेश्वर पेठे, अरुण वानकर, शेखर बोरसे, संतोष विश्वकर्मा, प्रकाश मेश्राम, राजू भोयर, रियाज शेख, शरद शाहू, बंटी फलके, पंकज मरसकोल्हे आदींचा समावेश होता. दिलेला शब्द पाळा : राजेंद्र मुळक केंद्र आंणि राज्याची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता त्याचे पालन करा, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केली आहे. लहान शेतकरी, मोठा शेतकरी ही सरकारची भाषा शेतकऱ्यांचे आंदोलन कमजोर करणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारी आहे. शेतकऱ्यांनी हा शासनाचा कपटी स्वभाव ओळखावा आणि सरसकट कर्जमाफी घेण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहनही राजेंद्र मुळक यांनी केले आहे.