शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
4
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
5
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
6
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
7
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
8
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
9
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
10
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
11
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
12
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
13
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
14
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
15
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
16
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
17
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
19
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
20
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
Daily Top 2Weekly Top 5

आई म्हणजे मायेचा सागर

By admin | Updated: May 16, 2014 00:48 IST

आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर आहे. आईच्या उपकारांची महती अपार आहे. तिला हृदयाला प्रेमळ साद घालण्यासाठी लोकमत सखी मंच आणि कलाकृती साडीज् यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मॉ ...

 

 नागपूर : आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर आहे. आईच्या उपकारांची महती अपार आहे. तिला हृदयाला प्रेमळ साद घालण्यासाठी लोकमत सखी मंच आणि कलाकृती साडीज् यांच्या संयुक्त विद्यमाने  

हनुमाननगर येथील विमा रुग्णालयाजवळील संत रविदास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका नयना झाडे, कलाकृती साडीज्चे संचालक सुरेश चौधरी, संत रविदास सभागृहाच्या संचालिका शालिनी अनिल मानापुरे यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात पौराणिक आणि ऐतिहासिक मातांची वेशभूषा, आईवर स्वलिखीत कविता आणि माझी आई या विषयावर मनोगत अशा तीन स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्वच स्पर्धांंमधून आईला हृदयातून प्रेमळ साद घालण्यात आली. काहींनी तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता, ममता, माया आणि खरा आपलेपणाचा चिरंतन ओलावा, अनेक समस्यांवरचा एकच उपाय म्हणजे आई, असे संबोधले तर काहींनी मुलांना जिवापाड जपणारी, सुखदु:खांत पाठीशी उभी असलेली, आपल्या श्‍वासात वास करणारी, दूर असली तरी मुलांच्याच काळजीत असलेली आई सादर केली.

 

आई विषयी मनोगत व्यक्त करणार्‍या स्पर्धेत तर अनेकांचे डोळे पाणावले होते. यात नुकतीच देवाघरी गेलेली आई, बाप दारू पिऊन लोळत असताना कुटुंब सांभाळणारी आई, अडाणी आईची उच्च शिक्षित मुलं, आईच बाप होते, असे एकाहून एक किस्से व्यासपीठावर सादर होत असताना, आईवरचे प्रेम व्यक्त करणासाठी एक दिवस पुरेसा नाही, असे सहज वाटून गेले. पौराणिक आणि ऐतिहासिक मातांची वेशभूषा स्पर्धेत काहींनी राणी दुर्गावती, यशोदा, जिजाऊ, मदर टेरेसा, सावित्रीबाई फुले, हनुमानाची आई अंजनी आदींची वेशभूषा करून त्यांची भूमिका सादर केल्या. या स्पर्धेतून कितीही आधुनिकीकरण झाले, तरी जगात आईची प्रतिमा कधी बदलणारी नाही, हे दिसून आले.

यातच बुगीवुगी विनर्स खुशाली इंगळे, इंडिया गॉट टँलेटमध्ये धडक मारलेली मुग्धा देशकर, श्रद्धा भोयर आणि पौर्णिमा राऊत यांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले.

या तिन्ही स्पर्धेचे परीक्षण नाट्य आणि नृत्य विषारद वंदना माटे, दिग्दर्शिका व लेखिका शुभांगी पोहरे आणि कवी डॉ. दिलीप अर्जुने यांनी केले. प्रास्ताविक सखी मंच विभाग प्रतिनिधी रोशन शेगावकर यांनी तर संचालन सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले. कार्यक्रमाला विभाग प्रतिनिधी त्रिवेणी कायंदे, अरुणा शेंडे आणि मंगेश चरडे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

माँ तुझे सलाम’ : सखींनी आईला घातली प्रेमळ साद     ‘मॉ तुझे सलाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी या कार्यक्रमाला सखींनी भरभरून प्रतिसाद दिला.  ‘जेव्हा पाहो तेव्हा दिसे मम्मीचे ओठ लाल, घामाने वाहे मायेच्या कपाळाचे कुंकू लाल, डोक्यावरचा शेव फाटका उन्हात तापे माही माय’ स्वलिखीत कविता वाचन स्पर्धेतील या सारख्या अनेक कवितेला चांगली दाद मिळाली.