शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाचा शौक जीवावर बेतला

By admin | Updated: January 15, 2016 03:28 IST

डीपीला चिकटून मुलगा गंभीर : लोकांची बघ्याची भूमिका, सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परता

डीपीला चिकटून मुलगा गंभीर : लोकांची बघ्याची भूमिका, सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परतानागपूर : पतंग पकडण्याच्या नादात १४ वर्षीय मुलगा इलेक्ट्रिक डीपीतील खुल्या वायरच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना कामठी रोड, पीडब्ल्यूडी कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. करण साखरे असे मुलाचे नाव असून, तो पिवळी नदी परिसरातील रहिवासी आहे. तो आठव्या वर्गात शिकतो. प्राप्त माहितीनुसार, किशोर पतंग पकडण्यासाठी धावत होता. यादरम्यान पतंगाचा मांजा डीपीजवळून जात होता. त्याला पकडण्यासाठी किशोरने हात पुढे केला आणि वायरच्या संपर्कात आला. वायरमधील वीजप्रवाहामुळे किशोरचा चेहरा अणि हाताला दुखापत झाली. तो डीपीसमोरच जखमी अवस्थेत जमिनीवर पडला. त्याला मदत करण्याऐवजी काही तरुणांनी घटनेचे मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग करण्यातच धन्यता मानली. यादरम्यान लगतच्या विदर्भ डिस्टीलर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला बाजूला करून त्याच्यावर प्रथमोपचार केले. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या वर्षा श्यामकुळे आणि सविता राऊत यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मुलाला मदत केली. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. रितेश सोमकुंवरच्या मदतीने मुलाला उचलून आॅटोमोटिव्ह चौकातील एका खासगी रुग्णालयात भरती केले. सध्या मुलाची स्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. किशोरचे वडील अजय साखरे रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. मुलाच्या उपचारार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी सहा हजार रुपये गोळा करून रुग्णालयात जमा केले. सूचनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक खरे रुग्णालयात पोहोचले. विस्तृत माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी) तरुण व्हिडिओ काढण्यात गर्कदुर्घटनेनंतर काही तरुण अणि लोकांनी मुलाला मदत करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. काही तरुण घटनेचे मोबाईलने व्हिडिओ काढण्यात गर्क होते. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर मुलाला रुग्णालयात भरती केले.